Logistics Park : ‘निसाका’ वर ड्रायपोर्टऐवजी मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क

निफाड तालुक्यातील निफाड सहकारी साखर कारखान्याच्या १०८ एकर जागेवर २०१६ मध्ये रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ड्रायपोर्ट करण्याबाबतची घोषणा केली होती
Multi Logistics Park
Multi Logistics Park Agrowon
Published on
Updated on

नाशिक : निफाड तालुक्यातील निफाड सहकारी साखर कारखान्याच्या १०८ एकर जागेवर २०१६ मध्ये रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ड्रायपोर्ट (Dry Port) करण्याबाबतची घोषणा केली होती; मात्र केंद्र शासनाने ड्रायपोर्टचा प्रस्ताव गुंडाळला असून, येथे मल्टी लॉजिस्टिक पार्क (Multi Logistics Park) उभारण्याच्या दृष्टीने पावले टाकली जात आहेत.

Multi Logistics Park
Farmer Producer Company : जागतिक बाजारपेठेत ओळख मिळवलेली ‘ओम गायत्री’ कंपनी

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे हा मल्टी लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी आराखडा बनविला जात आहे. लॉजिस्टिक पार्कमध्येही फळे व शेतीमालाच्या निर्यातीचे काम चालणार आहे. शिवाय ‘निसाका’वरील कर्जाचा बोजा कमी होणार आहे.

प्रस्तावित ड्रायपोर्टबाबत निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांनी केंद्रीय बंदरे, जहाज वाहतूक व जलमार्गमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. त्यास उत्तर देताना या जागी भारतमाता परियोजनेच्या माध्यमातून मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क प्रकल्प उभा होणार असल्याबाबत बनकर यांना पत्र पाठवत माहिती दिली आहे.

Multi Logistics Park
Sugar Export : साखर कराराबरोबर पाठवणीलाही वेग

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकने निफाड सहकारी साखर कारखान्याची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी ही जागा ताब्यात घेतली आहे. त्यामुळे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या संस्थेने या जागेतील काही क्षेत्र अधिग्रहीत करण्याचे ठरविले असून या जमिनीचे मूल्यांकन निश्चित करण्यात आले आहे.

२०१८ मध्ये नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ताब्यात असलेली ही जमीन जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने हस्तांतरणासाठी मान्यता दिल्यानंतर केंद्र शासनाकडून या प्रकल्पाबाबत कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नव्हती.

Multi Logistics Park
Rabbi Sowing : रब्बी पेरणी का पडतेय लांबणीवर ? | ॲग्रोवन

याबाबत आमदार बनकर यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे पाठपुरावा केला. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी निफाड परिसर पूरक आहे, यासह विकासाच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाला सविस्तर अहवाल पाठविला होता.

आता या जागेवर मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क उभे होणार आहे. तत्कालीन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेत ३५ कोटी विक्रीकर माफ करून घेतल्याने जागेचा मार्गसुद्धा मोकळा झाला होता. निफाड येथील ड्रायपोर्टची जागा रेल्वेमार्ग व नाशिक औरंगाबाद महामार्गाजवळ असल्याने वाहतूक सोपी होणार असल्याने लॉजिस्टिक पार्क उभारण्याच्या कामावर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे.

‘निसाका’त शेतीमाल निर्यातीबरोबर होणार रोजगारनिर्मिती

‘निसाका’वरील प्रस्तावित ड्रायपोर्टचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कृषी क्षेत्राला वरदान ठरणारा आहे. त्यासाठी मंत्री व अधिकाऱ्यांसमवेत सतत बैठका घेतल्या.

पाठपुराव्यानंतर आता केंद्र शासन मल्टी लॉजिस्टिक पार्क उभारण्याच्या तयारीत आहे. शेतीमाल निर्यातीबरोबरच निसाका परिसरात रोजगारनिर्मिती होईल. त्या प्रकल्पावर लवकर शिक्कामोर्तब करावे, असे निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी सांगितले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com