Bio Diesel Policy : जैवइंधन धोरणावर आज राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

जैवइंधन धोरण व त्यातील संधींचा आढावा घेण्यासाठी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) पुण्यात बुधवारी (ता. १९) राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे.
Bio Energy
Bio EnergyAgrowon
Published on
Updated on

Pune News : जैवइंधन धोरण व त्यातील संधींचा आढावा घेण्यासाठी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) पुण्यात बुधवारी (ता. १९) राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. केंद्रीय नवी व अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाचे उच्चपदस्थ अधिकारी व देशविदेशांतील तज्ज्ञ यात सहभागी होत आहेत.

Bio Diesel Policy जैवइंधन व जैव ऊर्जा अशा दोन्ही क्षेत्रांना या चर्चासत्रात स्थान देण्यात आले आहे. कात्रज भागातील न्याती काउंटीमधील कोरिथिएन्स रिसॉर्ट येथे सकाळी दहा वाजता होत असलेल्या चर्चासत्रात देश विदेशातील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी व शास्त्रज्ञ सहभागी होत आहेत.

विस्मासह महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने संघ, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन व कोजन असोसिएशन ऑफ इंडिया अशा नामांकित संस्थांनी एकत्र येत या चर्चासत्राचे आयोजन केले आहे.

विस्माचे व्यवस्थापकीय संचालक अजित चौगुले यांनी सांगितले, की राज्यातील साखर उद्योगाला खासगी संस्थांच्या चळवळीतील नवी दिशा देणारे तसेच जैव इंधन कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करणारे विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने होत असलेल्या विविध परिसंवादांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील संशोधन संस्थांमधील तज्ज्ञ सहभागी होत आहेत.

Bio Energy
Bio-Diversity : पठारांवरील जैवविविधता संवर्धनाची गरज’

केंद्रीय नवी व अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सुबोधकुमार सिंग, सहसचिव दिनेश जगदाळे तसेच राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, सरचिटणीस पांडुरंग राऊत उद्‌घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

Bio Energy
Bio Fertilizers : जैविक खतांमुळे अन्न सुरक्षा धोक्यात?

आयआयटी खडकपूरच्या प्रा. रिंतू बॅनर्जी, आयसीटीचे डॉ. अतुल चासकर, अमेरिकेतील डॉ. विक्रम पत्तरकिरने या नामवंत तज्ज्ञांकडून त्यांच्या संशोधनाचे मुद्दे साखर उद्योगातील प्रतिनिधींसमोर मांडले जाणार आहेत.

राष्ट्रीय जैव इंधन धोरणाची पुढील दिशा, द्वितीय पिढीतील इथेनॉल निर्मितीचे संशोधन, साखर उद्योगातील रसायन निर्मिती व त्यातून होणारी आर्थिक उलाढाल, साखर उद्योगातील पर्यावरण व्यवस्थापनातील कृत्रिम बुद्धिमत्तेचे स्थान, कॉम्प्रेस्ड बायोगॅसचे विपणन व भविष्यातील संधी, हायड्रोजन निर्मितीमधील इलेक्ट्रोलेस्टर तंत्रज्ञान, औद्योगिक सुरक्षा व अपघात आदी महत्त्वपूर्ण विषयावर दिवसभर परिसंवाद होणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com