
नवी दिल्ली ः ‘‘भाजप विरोधात लढण्यासाठी समविचारी धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावे. विरोधकांना एकत्र आणून संयुक्त आघाडी बनविण्यात शरद पवार (Sharad Pawar) यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे त्यामुळे एकजुटीचे उद्दिष्ट यशस्वीपणे साध्य होईल,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) विरोधी ऐक्याचा आराखडा शनिवारी (ता. १०) जाहीर केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची कार्यकारिणीच्या बैठकीत फेरनिवड करण्यात आली. या वेळी विरोधकांना एकत्र आणण्यात शरद पवार यांची भूमिका निर्णायक राहील, असेही राष्ट्रवादी काँग्रेसकडून ठामपणे सांगण्यात आले. कोरोनामुळे मागील चार वर्षे पक्ष कार्यकारिणीची बैठक तसेच राष्ट्रीय अधिवेशन होऊ शकले नव्हते. त्यापार्श्वभूमीवर आज दिल्लीच्या ‘कॉन्स्टिट्यूशनल क्लब’मध्ये विस्तारित कार्यकारिणीची बैठक झाली.
त्यात पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. शरद पवार यांनी उद्घाटनपर भाषणात मोदी सरकारचे धोरण महिलाविरोधी तसेच शेतकरी विरोधी असल्याचा हल्ला चढविला. पंतप्रधान मोदी लालकिल्ल्यावरून महिला सन्मानाबद्दल बोलतात; पण त्यांच्या गृह राज्यात बिल्कीस बानोवरील बलात्कार करणाऱ्या दोषींची गुजरात सरकारने सुटका करणे हे महिलांबद्दलचा दृष्टिकोन दर्शविणारे आहे, अशीही तोफ पवार यांनी डागली.
राष्ट्रवादी झुकणार नाही
भाजपविरोधात लढण्यासाठी धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त करणारा ठराव मांडताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, की सत्ताधारी ‘एनडीए’ला चाप लावण्यासाठी शरद पवार यांनी या सर्वांना एकत्र आणण्यात व संयुक्त आघाडी बनविण्यात महत्त्वाची भूमिका राहिली आहे.’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.