

पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस कोसळत असून, काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश पाऊस पडत आहे. जुन्नरमधील राजूर येथे सर्वाधिक २४० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) नद्यांच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली असून, नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
जिल्ह्यात बुधवारी (ता. १३) सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती. दुपारनंतर काही प्रमाणात पावसाचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, पश्चिम पट्ट्यात पावसाचा जोर कायम होता. गुरुवारीदेखील (ता. १४) पूर्व भागातील हवेली, शिरूर, दौंड, इंदापूर, पुरंदर, खेड या तालुक्यांत सकाळी पावसाने काहीशी उघडीप दिली होती. परंतु भोर, मावळ, मुळशी, खेडचा पश्चिम पट्टा, जुन्नर, आंबेगाव तालुक्यांत पावसाच्या मधूनमधून तुरळक सरी पडत होत्या.
या पावसामुळे खरिपातील पिकांना (Kharip Crops) दिलासा मिळत असला तरी भाजीपाला पिकांना हा पाऊस नुकसानकारक ठरत आहे. राजूर पाठोपाठ माळमधील लोणावळा येथेही २३४ मिलिमीटर पाऊस पडला. तर कार्ला २०४ मिलिमीटर, शिवणे १२४, काळे १४७, खडकाळा १३२, मुळशीतील माले १५९, मुठे १३२, पौड ११०, घोटावडे ११२ मिलिमीटर पाऊस पडला. वेल्ह्यामधील पानशेत १२८, वेल्हा १३९, विंझर ११६, जुन्नरमधील आपटाळे ११२, खेडमधील पाईट १०० मिलिमीटर पाऊस पडला.
तर, पूर्व भागात पावसाचा जोर कमी असून, अनेक भागांत हलक्या सरी बरसल्या. बारामतीतील माळेगाव येथे ११ मिलिमीटर, बारामती १८, पणदरे १२, वडगाव १९, लोणी १७, मोरगाव १९, उंडवडी १२, सुपा ८, इंदापुरातील भिगवण १२ मिलिमीटर, अंथुर्णे १६, सणसर ११, तर इंदापूर, लोणी, बावडा, काटी, निमगाव येथे हलक्या सरी पडल्या.
दौंडमध्ये कमी-अधिक पाऊस होता. तर राहू, दौंडमध्ये २५ मिलिमीटर, पाटस २३, यवत १८, कडेगाव १९, वरवंड १५ मिलिमीटर, तर रावणगाव, देऊळगावमध्ये तुरळक सरी पडल्या.
गुरुवारी (ता.१४) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडळनिहाय झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये :
हवेली - पुणे शहर ५३, केशवनगर ३३, कोथरूड ६०, खडकवासला ५४, थेऊर १७, उरुळीकांचन १०, खेड शिवापूर ४८, भोसरी ३७, चिंचवड ३४, कळस ५३,
हडपसर १२, वाघोली १५
मुळशी - थेरगाव ८०, पिरंगुट ७३
भोर - भोर ५०, भोलावडे ७०, नसरापूर ५१, किकवी २६, वेळू ४५, आंबवडे ६८, संगमनेर ७४, निगुडघर ८२
मावळ - वडगाव मावळ ७६, तळेगाव ७०,
वेल्हा - आंबवणे ७६
जुन्नर - जुन्नर ६६, नारायणगाव ४६, वडगाव आनंद २३, निमगाव सावा २७, बेल्हा ३४, डिंगोरे ९२, ओतूर १६
खेड - वाडा ३२, राजगुरुनगर ४०, कुडे ७४, चाकण ७०, आळंदी ४९, पिंपळगाव ४५, कन्हेरसर ७५, कडुस ८१
आंबेगाव - घोडेगाव ५३, आंबेगाव ६५, कळंब ५२, पारगाव २४, मंचर ५१
शिरूर - टाकळी ११, वडगाव २२, न्हावरा २८, मलठण २४, तळेगाव २४, रांजणगाव १५, कोरेगाव ३५, पाबळ ३३, शिरूर २०
पुरंदर - सासवड २२, भिवंडी ३४, कुंभारवळण ९, जेजुरी १५, परिंचे १५, राजेवाडी ५, वाल्हा १४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.