Fertilizer : खत कंपनी, वितरकासह तीन केंद्रांचा परवाना निलंबित

Crop Damage Due To Fertilizer : जामनेर तालुक्यातील १३ गावांत सरदार ॲग्रो फर्टिलायझर केमिकल प्रा. लिमिटेड (गुजरात) या कंपनीचे खत वापरल्याने २२५ शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते.
Fertilizer
FertilizerAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : जामनेर तालुक्यातील १३ गावांत सरदार ॲग्रो फर्टिलायझर केमिकल प्रा. लिमिटेड (गुजरात) या कंपनीचे खत वापरल्याने २२५ शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते. त्याची तक्रार कृषी विभागाकडे करण्यात आली होती.

या प्रकरणी तालुका तक्रार निवारण समिती अहवालात नोंदवलेल्या निष्कर्षांवरून संबंधित खत कंपनीसह जळगाव येथील खत वितरक व जामनेर येथील तीन किरकोळ विक्रेत्यांविरुद्ध जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच खत कंपनीचा खत परवाना व जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या आदेशावरून जामनेर तालुक्यातील तीन खत विक्रेत्यांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

Fertilizer
Fertilizer Linking : लिंकिंग करणाऱ्या विक्रेत्यांची तक्रार आता व्हॉट्सॲपवर

जामनेर तालुक्यातील १३ गावांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरदार ॲग्रो फर्टिलायझर केमिकल कंपनीसह जळगाव येथील घाऊक खत व्यापारी (होलसेलर), तसेच येथील तीन किरकोळ विक्रेत्यांविरोधात मोहीम अधिकारी तथा खत निरीक्षक विजय पवार यांनी जामनेर येथे गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित कंपनीचे खत वापरल्याने २२५ शेतकऱ्यांचे ४२३ हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले होते. याप्रकरणी सर्वप्रथम तोंडापूर येथील शेतकऱ्यांनी जामनेर पंचायत समिती कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्याने प्रशासन जागे झाले. त्यानंतर तत्काळ पाल कृषी प्रशिक्षण केंद्र शास्त्रज्ञ पाटील यांनी पिकाची पाहणी केली होती. खताचे नमुने घेऊन हैदराबाद व नाशिक येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

Fertilizer
Fertilizer Shortage : खतांची अभूतपूर्व टंचाई

कंपनीचा खताबाबत निष्कर्ष

सरदार ॲग्रो फर्टिलायझर ॲण्ड केमिकल प्रा. लिमिटेड कंपनीच्या उत्पादित सिंगल सुपर फॉस्फेट खतामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचे तालुका तक्रार निवारण समिती अहवालात निष्कर्ष नोंदविलेला असल्यामुळे या विक्रेत्यास देण्यात आलेले खत विक्री प्राधिकरण पत्र १५ फेब्रुवारी २०२८ पर्यंत कंपनीचा खत परवाना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश कृषी आयुक्तालयातील संचालक यांच्याकडून देण्यात आला आहे.

...या विक्रेत्यांचा परवाना निलंबित

वितरक पार्श्वनाथ ॲग्रोटेक (कानळदा रोड, जळगाव) तसेच जामनेरातील बालाजी ट्रेडर्स (तोंडापूर), धनलक्ष्मी कृषी केंद्र (तोरनाळा), अभिषेक कृषी केंद्र (मोयखेडा) या तीन कृषी केंद्र व जळगाव येथील वितरकांचा खत विक्री परवाना निलंबित करण्यात येत असून, निलंबित कालावधीत कोणत्याही खताची खरेदी, साठवणूक तसेच विक्री न करण्याचे आदेश कृषी विभागाने दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com