MAFSU : वन्यजीवांविषयी जाणण्यासाठी चला ‘माफसू’च्या संग्रहालयात

Animal Husbandry : राज्यातील माशांच्या विविध प्रजाती, माशांपासून तयार होणारे खाद्यपदार्थ, डांगी, गिर, साहिवाल जातीच्या गाईंची वैशिष्ट्यांसह मत्स्य, पशुसंवर्धन आणि वन्यप्राणी विषयक प्रश्‍नांची उत्तरे आता एकाच छताखाली मिळणार आहेत.
MAFSU
MAFSUAgrowon

Napur News : राज्यातील माशांच्या विविध प्रजाती, माशांपासून तयार होणारे खाद्यपदार्थ, डांगी, गिर, साहिवाल जातीच्या गाईंची वैशिष्ट्यांसह मत्स्य, पशुसंवर्धन आणि वन्यप्राणी विषयक प्रश्‍नांची उत्तरे आता एकाच छताखाली मिळणार आहेत. हे छत म्हणजे महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने फुटाळातलावाजवळच्या माफसू ग्रंथालयानजिक उभारलेले अभिनव संग्रहालय.

नागपुरातील ‘माफसू’च्या मुख्यालयीच अभ्यासकांना देश आणि राज्यातील दुधाळ जनावरे, पशू व मत्स्य संवर्धन अशा घटकांची माहिती देणारे कोणतेच दालन नव्हते. परिणामी ‘माफसू’ने संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसांत त्याचे लोकार्पण होईल, अशी माहिती ‘माफसू’च्या सूत्रांनी दिली.

MAFSU
MAFSU : ‘माफसू’चे विद्यार्थी वापरतात ५० वर्षे जुने फर्निचर

संग्रहालयाच्या सुरुवातीला स्वागतकक्ष, त्यानंतर ग्रामीण जनजीवनाची माहिती देणाऱ्या कुटुंबाचे शिल्प साकारले आहे. यामध्ये परसातील कुक्‍कुटपालन, कोंबड्यांना पशुखाद्य खाऊ देणारी महिला, अंगणात खेळणारा चिमुकला, कोंबडी विक्रेता असे देखावे आहेत. त्यापुढील कक्ष हा कुक्‍कुटपालन व्यवसाय विषयक आहे.

MAFSU
MAFSU Protest : ‘माफसू’चा प्रस्तावित डिप्लोमा रद्द करण्यासाठी आंदोलन

या ठिकाणी कोंबड्यांच्या विविध जाती, अंड्यांमध्ये पिल्लांचा २० दिवसांचा जीवनक्रम अप्रतिमपणे रेखाटला आहे. पशुपालनासाठी स्वतंत्र अभ्यास कक्ष आहे. देश व राज्यातील विविध दुधाळ आणि शेतीकामी उपयोगी पडणारी जनावरे, पौष्टिक चाऱ्याचे प्रकार, दूध प्रक्रिया केंद्राचे मॉडेल देखील आहेत.

नागपुरी, पूर्णाथळी, मुऱ्हा सह विविध दुधाळ म्हशीच्या जातीच्या प्रतिकृती येथे पाहता येतात. दुधातील घटक, दुधापासून तयार होणारे विविध प्रक्रिया पदार्थही येथे मांडले आहेत. मत्स्य व्यवसायाचे स्वतंत्र दालन आहे. सागरी जीव व त्यांच्यापासून तयार होणारे पौष्टिक खाद्यपदार्थ, वन्यप्राणी अशा भरगच्च माहितीचा खजिना या ठिकाणी आहे.

अभ्यासकांना एकाच छताखाली माहिती मिळावी, असा ‘माफसू’ संग्रहालयाचा उद्देश आहे. तब्बल एक कोटी रुपये खर्च करून हे संग्रहालय साकारले आहे. याकामी ‘माफसू’अंतर्गत शिरवळ, परभणी, अकोला, उदगीर, मुंबई येथील पशू व मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या तज्ज्ञांची मदत घेण्यात आली.
- डॉ. अनिल भिकाने, संचालक, विस्तार, माफसू, नागपूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com