Chandrapur News: पिपरबोडी गावशिवारात बिबट्याचा धुमाकूळ

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागूनच पिपरबोडी हे गाव आहे. जंगलालगत गाव असल्याने वन्यप्राण्यांचा नेहमीच या भागात वावर राहिला आहे.
Leopard Terror in Chandrapur
Leopard Terror in Chandrapur Agrowon
Published on
Updated on

Leopard Terror in Chandrapur : तालुक्यातील पिपरबोडी गावशिवारात गेल्या काही दिवसांपासून एका बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. या बिबट्याने (Leopard Attack) आजवर दोघा व्यक्तीवर हल्ला (Bibtya Attack) करण्याचा प्रयत्न केला. गावातील नंदू स्वामी या युवकावर हल्ला (Leopard Attack) करून त्याला किरकोळ जखमी केले आहे.

गावशिवारात सातत्याने बिबट्याचा वावर सुरू असल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागूनच पिपरबोडी हे गाव आहे. जंगलालगत गाव असल्याने वन्यप्राण्यांचा नेहमीच या भागात वावर राहिला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने गावाच्या परिसरात ठाण मांडले आहे.

Leopard Terror in Chandrapur
Leopard Attack : टेंभोली गावात बिबट्याचा वावर?

या बिबट्याने गावातील दोघांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे ते थोडक्यात बचावले. नंदू स्वामी या युवकावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले. गेल्या दहाबारा दिवसांपासून एका बिबट्याने गाव परिसरात दहशत निर्माण केली आहे.

Leopard Terror in Chandrapur
Leopard in Chandrapur: राजुरा वनपरीक्षेत्रात बिबट्या जेरबंद

गावातील लहान मुले शाळेसाठी, तर नागरिक अन्य कामांसाठी गावाबाहेर जात येत असतात. या बिबट्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या बिबट्याने केवळ दर्शन न देता गावकऱ्यांवर हल्ला केला आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

वनविभागाने या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य शंकर कालनिडी यांनी निवेदनातून केली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तसे निवेदन दिले आहे.

शेतीचे कामे प्रभावित

सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. हा पिके काढण्याचा कालावधी आहे. मात्र, गावाच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी, शेतमजूर शेतात जाणे टाळत आहे.

बिबट्याच्या दहशतीमुळे शेतीची कामेही प्रभावित झाली आहेत. त्यामुळे वनविभागाने या भागात पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com