Raju Shetti Vs Hasan Mushrif : मुश्रीफांच्या रक्तपाताच्या वक्तव्यावरून राजू शेट्टींनी घेतला समाचार

Ichalkaranji Water Scheme : काळम्मावाडी धरणाच्या जलाशयामध्ये किती पाणी शिल्लक आहे त्याचे नियोजन करून इचलकरंजीकरांना पाणी द्यावे.
Raju Shetti Vs Hasan Mushrif
Raju Shetti Vs Hasan MushrifAgrowon

Ichalkaranji Water Scheme : सुळकूड येथून पाणी घेण्याचा अट्टाहास का? आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून याबाबतची माहिती देणार आहोत. इचलकरंजीला सुळकूडमधून नाही, तर मजरेवाडी योजनेतूनच पाणी द्या; अन्यथा रक्तपात होईल, असे वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केले होते. दरम्यान यावर इचलकरंजीकरांनीही संतप्त प्रतिक्रीया दिली. याचबरोबर माजी खासदार राजू शेट्टी यांनीही हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली आहे.

जनतेला पाणी प्यायला पाणी देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे, आणि सरकारमधीलच एक मंत्री इचलकरंजीला पाणी द्याल तर रक्ताचे पाट वाहतील असे वक्तव्य करत असतील तर याचा गांभीर्याने विचार राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी करावा. दरम्यान मागच्या वर्षभरापूर्वी याच मुश्रीफांनी मीच सूळकूड पाणी योजना मंजूर केली म्हणून पेढे वाटले. तेच मुश्रीफ आज अशी भाषा करत असतील तर यांची दखल घ्यावी असे शेट्टी म्हणाले.

याचबरोबर त्यांनी अनेकवेळा मंत्रीपदाची शपथ घेतली आहे यावेळी त्यांनी भयमुक्त समाज करणार म्हणून शपथ घेतलेली असते परंतु तेच अशी भाषा करत आहेत. मंत्री हे कोणत्याही एका मतदार संघापूरते मर्यादीत नसून ते राज्याचे प्रतिनिधी म्हणून वावरत असतात त्यांची जनतेला स्वच्छ पाणी देणे ही नैतिक जबाबदारी असते असेही शेट्टी म्हणाले.

तसेच इचलकरंजीकरांना पिण्याचे पाणी हे जिल्ह्यातील शिल्लक साठ्यातील पाणी देण्याची मागणी आहे. काळम्मावाडी धरणाच्या जलाशयामध्ये किती पाणी शिल्लक आहे त्याचे नियोजन करून इचलकरंजीकरांना पाणी द्यावे. शहरी आणि ग्रामीण असा वाद लावून सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये असेही शेट्टी म्हणाले. ज्यावेळी शेतीला पाणी कमी पडेल त्यावेळी मी शेतकऱ्यांचा बाजूने राहीन असेही आश्वासन त्यांनी दिले.

Raju Shetti Vs Hasan Mushrif
Ichalkaranji Water Scheme : 'हसन मुश्रीफांना रक्तपात घडवायचा आहे का'?

काय आहे नेमका वाद

शासकीय विश्रामगृहात झालेल्या दूधगंगा बचाव कृती समितीच्या बैठकीत हसन मुश्रीफ बोलत होते. इचलकरंजीला पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी सुळकूड येथील दूधगंगा नदीतून पाणी नेण्याची योजना आखण्याची मागणी करण्यात आली आहे. याला राधानगरी, भुदरगड, कागल, करवीर, शिरोळ आणि निपाणी या तालुक्यांनी विरोध दर्शवला आहे. यासंदर्भातील दूधगंगा बचाव कृती समितीची बैठक झाली.

इचलकरंजी शहरासाठी अमृत योजनेअंतर्गत दूधगंगा नदीतून सुळकुड गावाजवळून पाणी नेण्याची योजना मंजूर झाली. कागलमधील लोकप्रतिनिधींनी विरोध केल्यानंतर इचलकरंजी विरुद्ध कागल असा वाद पेटताना दिसत आहे. आज दूधगंगा बचाव कृती समितीची सर्वपक्षीय बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. या बैठकीत इचलकरंजीला सुळकुड योजनेतून पाणी न देण्याचा एकमुखी निर्धार करण्यात आला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com