Water Crisis : कोळगाव डोळस येथील तलाव कोरडा

Water Scarcity : कोळगाव डोळस येथील पाझर तलाव कोरडाठाक पडला आहे. दमदार पावसाअभावी पेरणी केलेले बाजरी, मूग तसेच इतर पिके सुकू लागली आहेत.
Water Shortage
Water Shortage Agrowon
Published on
Updated on

Pune News : कोळगाव डो येथील पाझर तलाव कोरडाठाक पडला आहे. दमदार पावसाअभावी पेरणी केलेले बाजरी, मूग तसेच इतर पिके सुकू लागली आहेत. विहिरी, कूपनलिकांची पाणीपातळी खालावली आहे. काही विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पावसाच्या हुलकावणीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

तलाव क्षेत्र कोरडे पडल्याने या तलाव क्षेत्रात उगवलेल्या गवताचा परिसरातील शेळ्या, मेंढ्या, जनावरे चारा म्हणून उपयोग करीत आहे; मात्र हा चारादेखील काही दिवसांत संपणार आहे. मेंढपाळांना चाऱ्याचा शोध घ्यावा लागणार आहे.

यामुळे या भागात पाऊस पडणे गरजेचे बनले आहे. विहिरी कूपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे, तर काही विहिरी कोरड्या पडल्या आहेत. यामुळे शेतात उभी असणारी पिके संकटात सापडली आहे.

Water Shortage
Water Crisis : पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य द्या

शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने हुलकावणी दिली आहे. यामुळे कोळगाव डोळस येथील पाझर तलावातील पाणीसाठा संपुष्टात येऊन तलाव कोरडा पडला आहे.या तलावातील पाण्याचा निर्वी, शिरसगाव काटा, कुरुळी, आंधळगाव आदी गावांना मोठ्या प्रमाणावर फायदा होतो.

पाणलोट क्षेत्रातील शेतीच्या पाण्याचा काही प्रमाणात प्रश्न निर्माण झाला आहे. दमदार पावसाअभावी ओढ्या-नाल्यांना पाणी आले नाही. यामुळे पिके सुकली आहेत, अशी माहिती उपसरपंच सखाराम गोरे यांनी दिली.

Water Shortage
Water Crisis : आटपाडी तालुक्यात पाणीउपसा बंदी

अर्धा सप्टेंबर महिना उलटला तरी कोळगाव डोळस परिसरात जोरदार पाऊस पडला नाही. त्यामुळे अद्याप ओढ्यांना पाणी आले नाही. परिणामी येथील पाझर तलाव कोरडा पडला आहे.

पाऊस येत्या काही न पडल्यास पाणीटंचाईची समस्या निर्माण होईल, असे सरपंच उषा जगताप यांनी सांगितले. चासकमान धरणाचे पाणी सोडून तलाव त्वरित भरून द्यावा, अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे

चासकमान कालव्याच्या पाण्याची मागणी

चासकमान धरणाचे पाणी सुटून एक महिना उलटल्यानंतरही अजूनही कोळगाव डोळस येथील तलावात पाणी आलेले नाही. चासकमान धरणाचे पाणी सोडून तलाव त्वरित भरून द्यावा, अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.

पाणीपुरवठा योजना झाली ठप्प

कोळगाव डोळस येथील तलावावर ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजना आहे. तलाव कोरडा पडल्याने ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजना सध्या बंद आहे. पाणीपुरवठा योजना बंद असल्याने नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com