Kunabi Jodo Abhiyan: न्याय्य-हक्‍कांसाठी रायगडमध्ये एकवटला कुणबी समाज

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी तसेच समाज संघटना मजबूत करण्याकरता कोकणातील कुणबी समाज एकवटला असून महाड तालुक्यातील सुमारे बारा हजार बांधवांनी एकत्र येत अभियानाची सुरुवात केली.
Kunabi Jodo Abhiyan
Kunabi Jodo AbhiyanAgrowon
Published on: 
Updated on: 

महाड : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी तसेच समाज संघटना मजबूत करण्याकरता कोकणातील कुणबी समाज (Kunabi Community) एकवटला असून महाड तालुक्यातील सुमारे बारा हजार बांधवांनी एकत्र येत अभियानाची सुरुवात केली.

Kunabi Jodo Abhiyan
Agriculture Technology : कृषी क्षेत्र डिजिटल तंत्रज्ञानाच्या दिशेने...

रत्नागिरीतून कोकणातील कुणबी जोडो अभियानाची (Kunabi Jodo Abhiyan) डिसेंबर २०२२ मध्ये सुरुवात झाली.

कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष भूषण बरे यांच्या प्रमुख नेतृत्त्वाखाली, कुणबी राजकीय संघटन समिती अध्यक्ष अशोक वालम यांच्या प्रयत्नातून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई, उपनगर क्षेत्र, नवी मुंबईत कुणबी जोडो अभियान राबविले जात आहे.

मुंबईतील कुणबी समाजोन्नती संघ या शतकोत्तरी वाटचाल केलेल्या मातृसंस्थेच्या वतीने ८ जानेवारीला महाड व पोलादपूर तालुक्यातील सुमारे बारा हजार कुणबी समाजबांधव एकत्र आले होते.

Kunabi Jodo Abhiyan
Maratha Seva Sangh : महामानवांची बदनामी करणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्याची तरतूद करा

रायगड जिल्ह्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅली काढण्यात आली. माजी आमदार शांताराम फिलसे यांच्या जन्मभूमी चिंभावे गावी तालुकास्तरीय कुणबी जोडो अभियान रॅलीचा समारोप झाला.

कुणबी समाजोन्नती संघातर्फे रायगड जिल्ह्यातील सर्व तालुका शाखांच्या वतीने १० जानेवारी - म्हसळा, ११ जानेवारी - श्रीवर्धन, १२ जानेवारी - तळा, १३ जानेवारी - रोहा, १४ जानेवारी - मुरूड, अलिबाग, १५ जानेवारी - पेण, उरण, कर्जत, खालापूर, पाली येथे कुणबी जोडो अभियान राबवले जाणार असून पनवेल येथे समारोप होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com