Sugarcane : कोल्हापूरच्या ‘रामेती’चा नेदरलँडच्या संस्थेशी करार

कृषी विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्यात सात संस्था आहेत. या संस्था कृषी विभागात नवीन दाखल होणारे कृषी कर्मचारी व अन्य कृषी अधिकाऱ्यांनाही कृषिविषयक प्रशिक्षण देतात.
Sugarcane
Sugarcane Agrowon
Published on
Updated on

कोल्हापूर : ऊस उत्पादकांना (Sugarcane Producer) दर्जेदार प्रशिक्षणाबरोबरच जमीन आरोग्य व्यवस्थापन (Land Health Management), ऊस उत्पादकता (Sugarcane Productivity) वाढ, कार्यक्षम पाणी व्यवस्थापन (water Management) याचबरोबर रोपवाटिकेची (Nursery) माहिती मिळावी यासाठी येथील प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेने (रामेती) नेदरलँडच्या सॉलिडरीडॅड या संस्थेशी सामंजस्य करार केला.

कृषी विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्यात सात संस्था आहेत. या संस्था कृषी विभागात नवीन दाखल होणारे कृषी कर्मचारी व अन्य कृषी अधिकाऱ्यांनाही कृषिविषयक प्रशिक्षण देतात. सात संस्था पैकी कोल्हापुरात असणाऱ्या ‘रामेती’ने मात्र चाकोरी बाहेर जात थेट शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हा राज्यातील पहिलाच उपक्रम सुरू केला आहे.

कराराच्या माध्यमातून रामेतीच्या वतीने जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षण मिळणार आहे. रामेती व या संस्थेने ठरवलेले तज्ज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील. या मार्गदर्शनाद्वारे शेतकऱ्यांना थेट उत्पादन वाढीचे धडे मिळतील.

Sugarcane
Sugarcane : यंदाही मराठवाड्याचा ऊस हंगामच सर्वाधिक चालणार

नेदरलँड स्थित सॉलिडरीडॅड ही संस्था देशभरातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम करते. १४ पिकाची उत्पादन वाढ, व मूल्यसाखळी निर्मिती यावर काम करते. प्रशिक्षणांची उपलब्धता करून देते. देशभरात उसामध्येही ही संस्था कारखान्यांना सोबत घेऊन काम करत आहे. पूर्णपणे ‘ना नफा ना तोटा’ या पद्धतीने संस्थेचे काम आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काही कारखान्यांसमवेत त्यांचे काम सुरू आहे. या संस्थेचे काम पाहून रामेतीचे प्राचार्य उमेश पाटील, सहायक संचालक नामदेव परीट आदींनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. रामेती समवेत काम करण्याची विनंती केली.

Sugarcane
Sugarcane : ऊस पक्वता काळाचा अभ्यास महत्त्वाचा....

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला हिरवा कंदील दाखवला. प्रशिक्षणाच्या पातळीवर पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कंपनीचे एशिया हेड अलोक पांडे यांनी कोल्हापुरात येऊन या कराराला मूर्त रूप दिले. विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, बायर कंपनीचे पदाधिकारी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

रामेतीचे पदाधिकारी आपल्या यंत्रणेमार्फत शेतकऱ्यांशी संपर्क साधतील. त्या त्या भागातील संबंधित कारखाना वा अन्य काही संस्थांच्या सभागृहामध्ये हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम होईल. तो पूर्णपणे मोफत असेल. या प्रशिक्षणामध्ये वक्त्यांची सर्व जबाबदारी ही सॉलिडरीडॅड या संस्थेकडे असेल. ऊस उत्पादकांना एकत्रित करण्याचे काम रामेती करेल. या दोघांच्या समन्वयातून शेतकऱ्यांना ऊस उत्पादनाचे धडे संबंधित तज्ज्ञ देतील.

आम्ही कृषी विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देत असतो पण शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आपल्या माध्यमातून काय करता येईल हा विचार होता. या संस्थेचे कामकाज पाहून आम्ही त्यांना संपर्क केला. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांचा मार्फत तज्ज्ञ वक्त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऊस शेतीचे धडे मिळणार आहेत. या माध्यमातून संघटित होणाऱ्या शेतकऱ्यांना पाणीपद्धती, जमीन सुधारणा, पाचटाचे महत्त्व जाणवून देण्याबाबत सातत्याने प्रयत्न करणार आहोत.
उमेश पाटील, प्राचार्य, रामेती, कोल्हापूर
शेतकऱ्यांना सर्व प्रकारची प्रशिक्षणे देऊन त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आमची संस्था देशभरात प्रयत्न करते. इतर पिकाप्रमाणे ऊस पिकामध्ये आमचे काम सुरू आहे. शासकीय संस्थेने आमच्याशी या बाबत केलेला करार आम्हालाही उत्साहवर्धक आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चांगले प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करू.
अलोक पांडे, आशिया हेड, सॉलिडरीडॅड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com