Kolhapur Tomato Stolen
Kolhapur Tomato Stolenagrowon

Kolhapur Tomato Stolen : CCTV ची नजर चुकवत तब्बल ५० हजारांचे टोमॅटो चोरीला, कोल्हापुरातील घटनेने खळबळ

Shirol Farmer : शिरोळ तालुक्यातील हेरवाड गावचे शेतकरी अशोक मस्के या शेतकऱ्याच्या रानातील टोमॅटो चोरील गेला आहे
Published on

Kolhapur News : मागच्या दोन महिन्यांपासून टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आपल्या शेतातील टोमॅटोची राखण करताना दिसत आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतातील तब्बल ५० हजारांचा टोमॅटो चोरल्याने एकच खळबळ उडाली. चोरट्यांनी आंधाराचा फायदा घेत थेट शेतातील टोमॅटोवर डल्ला मारल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरोळ तालुक्यातील हेरवाड गावचे शेतकरी अशोक मस्के या शेतकऱ्यांच्या रानातील टोमॅटो चोरीला गेला आहे. म्हस्के हे दरवर्षी भाजीपाल्याची शेती करतात. यंदा २५ गुंठ्यामध्ये त्यांनी टोमॅटोची लागवड केली. ते मागच्या दोन दिवसांपूर्वी शेतात येत पिकाची पाहणी करून टोमॅटो तोडण्याच्या नियोजनात होते परंतु शेतात आल्यानंतर टोमॅटोच नसल्याने त्यांना धक्का बसला.

चोरट्यांनी थेट शेतात जात कच्चे पक्के असलेले टोमॅटो चोरून नेले. अंदाजे २० ते ३० क्रेट टोमॅटोची चोरी चोरीला गेल्याची माहिती त्यांनी दिली. यामध्ये सुमारे ५० ते ६० हजार रुपयांचे म्हस्के यांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. अशोक मस्के यांनी संपूर्ण शेती परिसरात सीसीटीव्ही लावल्याचीही चर्चा आहे.

मात्र मुसळधार पाऊस पडत असल्याने सीसीटीव्हीची नजर चुकवत रात्रीच्या अंधारात या चोरट्यानी चक्क टोमॅटोवर डल्ला मारला. दरम्यान याबाबत पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली आहे.

Kolhapur Tomato Stolen
Kolhapur Flood : कोल्हापुरकरांना महापुराची धास्ती, वाहने लावली थेट रस्त्यांवर

जिल्ह्यात १५ दिवसात दुसरी घटना

दरम्यान मागच्या काही दिवसांपूर्वी टोमॅटोला आलेले दर पाहून एका समाजकंटकाने शेतकऱ्याच्या शेतातील टॉमेटो उपटून टाकल्याने दहा ते बारा लाखाचे नुकसान केले होते. कोल्हापुरातील सांगवडेवाडी येथील माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली होती. यानंतर ही दुसरी घटना घडली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com