Maratha Protest : कोल्हापूर -पुणे बससेवा तात्पुरती बंद, मराठा समाज्याच्या आंदोलनाचे पडसाद

Maratha Andolan : जालना जिल्ह्यासह, बीड, अहमदनगर, पुणे, बारामती, कोल्हापूर, सांगली, सातारा, या जिल्ह्यात आंदोलने व निदर्शने सुरु आहेत.
Kolhapur Pune ST Bus
Kolhapur Pune ST Busagrowon

Maratha Reservation News : मागच्या चार दिवसांपूर्वी जालना येथील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून उपोषण करणार्‍या मराठा आंदोलकांवर हल्ला करण्यात आला. दरम्यान या हल्ल्याचे लोण बघता बघता राज्यभर पसरले आहे. जालना जिल्ह्यासह, बीड, अहमदनगर, पुणे, बारामती, कोल्हापूर, सांगली, सातारा, या जिल्ह्यात आंदोलने व निदर्शने सुरु आहेत.

दरम्यान, कोल्हापूर सकल मराठा समाजाच्यावतीने उद्या (ता.०५) कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. याचबरोबर याचे तीव्र पडसाद उमटू नयेत म्हणून कोल्हापुरातून पुण्याकडे जाणारी एसटी वाहतूक सेवा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. तर कोल्हापूर सांगली या मार्गावरीलही बससेवा थांबवण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

मागच्या दोन दिवसांपासून पुण्याहुन जालना, संभाजीनगर, नांदेडला जाणारी बससेवा ठप्प झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशीही काही ठिकाणची बससेवा ठप्प असल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. त्याचबरोबर कोल्हापुरातून पुण्याकडे जाणारी एसटी वाहतुक सेवा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवासी पर्यायी मार्ग म्हणून खासगी बससेवा आणि रेल्वेचा मार्ग निवडत आहेत.

दरम्यान आज (ता. ०४) सकाळी सकल मराठा समाजाच्यावतीने जवाब दो आंदोलन ठेवण्यात आले होते. यावेळी ११ च्या सुमारास दसरा चौकात मराठा समाजाचे लोक जमण्यास सुरूवात झाली.

Kolhapur Pune ST Bus
Maratha Reservation : जालन्यात राज ठाकरेंनी घेतली मनोज जरांगेची भेट ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही टीका

यानंतर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामध्ये ‘जवाब दो, जवाब दो, महाराष्ट्र सरकार जवाब दो’, ‘एक मराठा, लाख मराठा’,‘या जनरल डायरचं करायचं काय, खाली डोकं वर पाय’ अशा घोषणांनी दसरा चौक दणाणून सोडला.

यानंतर सकल मराठा समाजाचे निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी या आंदोलनामागील भूमिका सांगितली. अमानूष लाठीचार्ज करणाऱ्या जिल्हा पोलिस अधीक्षक अन् उपअधीक्षक यांना निलंबित करा, या घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी आणि गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी उद्या, मंगळवारी कोल्हापूर शहर बंदचे आवाहन केले. त्याला सर्वांनीच पाठिंबा दिला.

सांगलीतून बससेवा पूर्ववत

सातारा बंदच्या पार्श्वभूमीवर सांगली कडून कराड, सातारा पुणे, मुंबई बस सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा आली होती दुपारी ३ पासून ती पूर्ववत करण्यात आली असल्याचे सांगली एस टी विभागीय नियंत्रक सुनील भोकरे यांनी कळविले आहे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com