Kolhapur Kalmmawadi Dam : यंदा कोल्हापूरातील काळम्मावाडी धरण भरण्याची शक्यता कमीच, जिल्हाधिकाऱ्यांकडून सूचना

Kalmmawadi Dam : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या चार दिवसांपासून पावसाने पूर्णत विश्रांती घेतली आहे. धरण परिसर सोडल्यास पावसाने दडी मारली आहे.
Kolhapur Kalmmawadi Dam
Kolhapur Kalmmawadi Damagrowon

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या चार दिवसांपासून पावसाने पूर्णत विश्रांती घेतली आहे. धरण परिसर सोडल्यास पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे.

राधानगरी धरणाचे स्वयंचलित दोन दरवाजे उघडे असतानाही रात्री आठनंतर पंचगंगा नदीची पाणीपातळी ३० फुटांपर्यंत खाली आली आहे. धरणातून ४२५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. तर २४ बंधारे पाण्याखाली आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या दूधगंगा प्रकल्पातील पाणीपातळी समाधानकारक वाढत आहे. सध्या २५.४० टीएमसीपैकी १८.४७ टीएमसी (७२.७४ टक्के) धरण भरले असून १९.६८ टीएमसी भरल्यानंतर दूधगंगा (काळम्मावाडी ) धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सर्वच नद्यांची पाणी पातळी कमी होत आहे. दरम्यान, काळम्मावाडी धरणाच्या गळतीमुळे धरणात गेल्यावर्षी जेवढा पाणीसाठा केला होता, तेवढाच पाणीसाठा केला जाणार आहे. धरणाची गळती वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या हे धरण ७२.७४ टक्के भरले आहे. धरणात १९ टीएमसीपर्यंत पाणीसाठा झाल्यानंतर विसर्ग सुरू केला जाणार आहे.

Kolhapur Kalmmawadi Dam
Kolhapur Flood Damage : वर्षभर पोटच्या गोळ्यासारख पिकवलं पण पूरानं सगळचं केलं बरबाद, ऊस शेतीला मोठा फटका

अलमट्टी धरण ९० टक्क्यांवर

अलमट्टी जलाशयात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने विसर्ग ९० हजारावरून ६० हजारापर्यंत केला आहे. मंगळवारी रात्रीपासून बुधवारी रात्रीपर्यंत अलमट्टी जलाशयात तीन टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. १२३ टीएमसी साठ्याच्या धरणात बुधवारी संध्याकाळी १११.८०६ टीएमसी पाणी भरले आहे.

सध्या हे धरण ९०.८४ टक्के भरले आहे. सध्या धरणात १ लाख ४ हजार १११ क्युसेक पाणी वाहून येत आहे. मंगळवारी ९० हजार क्युसेक विसर्ग होता. त्यात सकाळी कमी करून ६४ हजार ५०० करून पाहण्यात आले.

सध्या आवक आणि विसर्ग यात ४० हजार क्युसेकचा फरक आहे. ५१९.६० मीटर पातळीच्या धरणात पाणी साठा झाल्यास १२३.०८१ पाणीसाठा केला जातो. हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून १२ टीएमसी पाणी साठा आवश्यक आहे. गतवर्षीही अलमट्टीत ऑगस्टपूर्वीच शंभर टीएमसीपेक्षा अधिक पाणीसाठा झाला होता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com