Kolhapur Flood Damage : वर्षभर पोटच्या गोळ्यासारख पिकवलं पण पूरानं सगळचं केलं बरबाद, ऊस शेतीला मोठा फटका

Sugarcane Farming : कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाने पात्राबाहेर आलेल्या पाण्याने तब्बल ४५ हजार हेक्टरवरील ऊस पीक कुजण्याची शक्यता आहे.
Kolhapur Flood Damage
Kolhapur Flood Damageagrowon

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात १५ जुलै ते ३० जुलै या १५ दिवसांच्या कालावधीत धुवाँधार पावसाने झोडपून काढले. झालेल्या पावसाने जिल्ह्यातील सर्वच नद्यांचे पाणी पात्राबाहेर फेकले गेले.

राधानगरी, काळम्मावाडी धरण क्षेत्रात असणाऱ्या नद्यांना मोठा पूर आला होता यामुळे नदीकाठावरील ऊस, भातपिके पाण्याखाली गेली असून सर्वाधिक फटका ऊस शेतीला बसण्याची शक्यता आहे.

मागच्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसाने पात्राबाहेर आलेल्या पाण्याने तब्बल ४५ हजार हेक्टरवरील ऊस पीक कुजण्याची भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान हे ऊसाचे पीक कुजल्यास शेतकरी मोठ्या आर्थीक संकटात सापडण्याची भिती आहे.

झालेल्या पावसाने जवळपास ८० च्या आसपास बंधारे पाण्याखाली गेले होते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांचे पाणी परिसरातील शेतीत घुसल्याने पिकांना मोठा फटका बसणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक पूर बाधीत क्षेत्र शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील आहे. यामुळे शिरोळ, हातकणंगले व करवीर तालुक्यांना अधिक फटका बसणार आहे.

Kolhapur Flood Damage
Shoumika Mahadik : गोकुळच्या दूध पॅकिंग एजन्सीवरून घराणेशाही निघाली, शौमिका महाडिकांची खरमरीत टीका

उसाच्या पिकाला असा बसतो फटका

उसाच्या शेंड्यात गाळमिश्रित ओल्या चिखलाचा थर बसल्याने कुजण्याची प्रक्रिया वेगाने होते. ऊस शेंड्याकडून खाली वाळत जातो. पाण्यात बुडालेल्या कांड्याना मुळ्या फुटतात. पुराच्या पाण्यात आठ दिवसांपेक्षा अधिक ऊस राहिल्यास ८० ते १०० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com