Kolhapur Drought Condition : कोल्हापुरलाही दुष्काळाच्या झळा बसणार? ऑगस्टमध्ये फक्त २७ टक्के पाऊस

Maharashtra Rain : राज्यात पावसाने दडी मारल्याने धरणांची स्थिती अत्यंत बिकट, जुलै महिन्यातील काही दिवस सोडल्यास अद्याप पाऊस नाही.
Kolhapur Drought Condition
Kolhapur Drought ConditionAgrowon

Drought Conditions in Kolhapur : राज्यात पावसाने दडी मारल्याने धरणांची स्थिती अत्यंत बिकट आहे. दरम्यान जुलै महिन्यातील काही दिवस सोडल्यास अद्यापही पाऊस गायब झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात यंदा ऑगस्टमध्ये फक्त सत्तावीस टक्के पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १९७१.६ मिलिमीटर आहे. तर मान्सून सुरू झाल्यापासून जून महिन्यात सरासरी पर्जन्यमान ३६२.९ मिमी इतके झाले आहे.

पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यात यंदा खरिप पिकावर मोठा परिणाम झाला. यावर्षी १लाख ९२ हजार ६३३ हेक्टरवर उत्पादन झाले आहे. यामध्ये भात, ज्वारी, भुईमूग, नागली, सोयाबीन या पिकांचा समावेश आहे.

पाऊस लांबणीवर गेल्याने पेरण्या उशिराने झाल्या दरम्यान या क्षेत्रामध्ये कोळपणी आणि भांगलणीची कामे सुरू झालेली आहेत. भुईमूग सोयाबीन व इतर पिकांची उगवण चांगली व समाधानकारक होती. आता सर्व पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. परंतु पावसाअभावी पिकांची वाढ खुटण्याची शक्यता आहे.

भात पीक

भात पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ९२ हजार ३२० हेक्टर इतके आहे. चालू हंगामात भात ८९हजार११४ हेक्टर (९५.५५ टक्के) क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. पिकाची परिस्थिति समाधानकारक असून पीक वाढीच्या ते फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहेत. माळरानावरील भात पिकास पाण्याची गरज आहे.

नाचणी पीक

नाचणी पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १७ हजार १०० हेक्टर इतके आहे. आज अखेर १६ हजार ७१८ हेक्टर (९७.७७ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. रोपलागणी कामे पूर्ण झाली आहेत. पिकाची परिस्थिती समाधानकारक असून पीक वाढीच्या अवस्थेत आहे.

खरीप ज्वारी

खरीप ज्वारी पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ९३७ हेक्टर इतके आहे. आजअखेर ५५० हेक्टर (५८.७० टक्के) क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. पिकाची वाढ समाधानकारक आहे.

Kolhapur Drought Condition
Maharashtra Drought : दुष्काळ आणि पीक पॅटर्न यांचा संबंध काय?

सोयाबीन

सोयाबीन पिकाचे क्षेत्र ४२ हजार २०४ हेक्टर इतके आहे. ४० हजार ०५२ हेक्टर ( ९४.७४) क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. वेळेवर पाऊस न झाल्याने पेरणी न झालेल्या उर्वरित क्षेत्रावर आडसाली उस लागवड होणार आहे. हंगामाच्या सुरवातीस पाण्यावर पेरण्या झालेल्या क्षेत्रातील पीक दाणे भरण्याच्या ते पक्वतेच्या अवस्थेत आहे. परंतु शिरोळ तालुक्यातील काही गावामध्ये मोजाक रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

भुईमूग

भुईमूगाचे सर्वसाधारण क्षेत्र ३५ हजार ३१२ हेक्टर आहे. आज अखेर ३४ हजार ९३९ हेक्टर (९८.१४) टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पिकाची परिस्थिति समाधानकारक असून पीक फुलोरा ते आय सुटण्याचा अवस्थेत आहे. पिकांच्या वाढीसाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. कडधान्ये तूर, मूग, उडीद व इतर कडधान्याचे सर्वसाधारण क्षेत्र ३७९० हेक्टर इतके आहे. आज अखेर २ हजार ८८५ हेक्टर (७६.१२ टक्के) क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.

ऊस लागवड

सन २०२२-२३ च्या सर्व हंगामात लागवड झालेले १ लाख ८८ हजार ४५९ हेक्टर क्षेत्रावर ऊस पीक असून २३-२४ हंगामास हा उपलब्ध होणार आहे. तसेच सन २०२३- २४ करिता सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ८६ हजार २१५ इतके आहे. यामध्ये आडसाली हंगाम १० हजार ५८४ हेक्टर क्षेत्रावर लागण झालेली आहे. माहे एप्रिल, मे व जून महिन्यात भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या क्षेत्रामधील उस पिकाच्या वाढीवर परिणाम दिसून येत आहे. पूर्व भागातील तालुक्यामध्ये दमदार पावसाची अत्यंत आवश्यकता आहे.

जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय दिवेकर म्हणाले की, खरीप पिकासाठी ७६ महसूल मंडळात एकूण ५५ हजार ४२७ शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन एकूण १६ हजार ४८० हेक्टर क्षेत्र पीक विम्यात संरक्षित केले आहे. हंगामात जोखमी अंतर्गत पावसातील खंड याबाबी करता शिरोळ तालुक्यातील दोन महसूल मंडळाचा समावेश झाला असून, त्याच्या सर्वेक्षणाचे आदेश देत आले आहेत. त्याबाबतची अधिसूचना जारी करण्याची कार्यवाही सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com