
Kolhapur Bribe News : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात वन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. जळाऊ लाकडाने भरलेल्या वाहनांवर कारवाई न करण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी पकडले. प्रभारी परिमंडळ वन अधिकारी रॉकी केतन देसा व वनरक्षक परिमंडल वन अधिकारी मोहन आत्माराम देसाई अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सरदार नाळे यांनी दिली.
दरम्यान नाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचा जळाऊ लाकूड खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. मागच्या कित्येक वर्षांपासून ते जत (सांगली), सांगोला (सोलापूर) या भागातून लाकूड खरेदी करून ते भाड्याच्या वाहनातून ते कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तसेच इचलकरंजी या भागात विक्री करतात.
दरम्यान त्या भाड्याने घेतलेल्या वाहनातील लाकडाची तपासणी न करणे, वाहनातील जळाऊ लाकडांच्या वाहतूक परवान्यावर कारवाई न करणे आणि त्या वाहनावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी वन विभागातील रॉकी केतन देसा मोहन आत्माराम देसाई यांनी वीस हजारांच्या लाचेची मागणी केली याबाबत दोन दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने तक्रार केली होती.
त्यानंतर गुरुवारी (ता. ३१) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रामलिंग फाटा येथे सापळा रचला. त्यावेळी वन अधिकारी रॉकी देसा यांनी ही लाचेची रक्कम मोहन देसाई यांच्याकडे द्यायला सांगितले. त्यानंतर मोहन देसाई यांनी तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची रक्कम स्वीकारली यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बापू साळुंके, उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर, पोलिसविकास माने, सुनील घोसाळकर, सचिन पाटील, संदीप पवार, उदय पाटील, विष्णू गुरव आदींनी केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.