Kolhapur News : ‘‘जिल्ह्याला २०२३-२४ साठी २० हजार ७५० कोटींच्या पतपुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे,’’ अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली. कृषी क्षेत्रासाठी ५ हजार ४०० कोटी रुपयांचे तसेच सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगासाठी ५ हजार ३४५ कोटी रुपये तर पीक कर्जासाठी ३ हजार २९८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, बॅंक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक राजीव कुमार सिंग, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे, ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास व्यवस्थापक आशुतोष जाधव,
जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय दिवेकर, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे बी. पी. सावंत, अजय पाटील, राज कुमार सिंह आदी उपस्थित होते.
वार्षिक प पुरवठा आराखडा पुस्तिकेचे तसेच आरसेटीच्या वार्षिक कृती आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. मागील वर्षी विविध शासकीय योजनांमध्ये उत्कृष्ट काम केलेल्या बँकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
श्री. रेखावार म्हणाले, ‘‘लाभार्थ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यात पीएम स्व-निधी योजना महत्त्वपूर्ण आहे. पीएम स्वनिधी, पीक कर्ज योजनेसह अन्य शासकीय योजनांतर्गत बँकांकडे प्राप्त कर्ज प्रकरणे वेळेत निकाली काढावीत.
कोणत्याही परिस्थितीत लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे प्रलंबित ठेवू नका, कृषी व तत्सम क्षेत्र, लघु उद्योग क्षेत्र, प्राथमिक अप्राथमिक क्षेत्राची उद्दिष्टपूर्ती करावी. पंतप्रधान अन्न प्रक्रिया योजनांमध्ये लाभार्थ्यांना भरघोस लाभ देण्यात येतो.
त्या अंतर्गत प्रकरणे येण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा. याविषयी व्यापक जनजागृती करून प्रस्ताव मंजूर करावेत.’’ ‘पीक कर्जाचे खरिपासहित वार्षिक उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करावे,’ असेही त्यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.