Amravati News : ‘खरीप हंगाम २०२३-२४’मध्ये शेतकऱ्यांना पीककर्जासाठी निर्धारित केलेल्या पीककर्जाच्या एकूण लक्ष्यांकापैकी ७० टक्के कर्जवितरण करण्यात आले आहे. अद्याप ४३३ कोटी रुपये शिल्लक आहेत.
जिल्हा बँकेने लागू केलेल्या परतफेड सवलत योजनेचा एकूण थकीत कर्जदारांपैकी एक टक्का सभासदांनीच लाभ घेतला. तथापि, यावर्षीही या बँकेने कर्जवितरणात उच्चांक कायम ठेवला आहे. निश्चित लक्ष्यांकापैकी ९५ टक्के कर्जवितरण केले आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामासाठी १ लाख ८२ हजार ३०० सभासदांसाठी १४५० कोटी रुपयांचे पिककर्जवितरणाचे लक्ष्यांत निश्चित करण्यात आले होते. १ एप्रिलपासून कर्जवितरणास सुरूवात झाली. २७ जूनअखेर १०१७ कोटी रुपयांचे कर्जवितरण करण्यात आले. एकूण ८८ हजार ६३४ शेतकऱ्यांनी पीककर्ज घेतले आहे.
यामध्ये कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांचा समावेश अधिक आहे. कर्जवितरणाची सरासरी एकूण लक्ष्यांकाच्या तुलनेत ७० टक्के आहे. यामध्ये जिल्हा बँक आघाडीवर आहे. तर, वारंवार तंबी देऊनही राष्ट्रीय व खासगी बँकांनी हात आखडता ठेवला आहे.
राष्ट्रीय बँकांची सरासरी ५६ तर, खासगी बँकांची सरासरी केवळ २७ टक्के आहे. ग्रामीण बँकेने ९८ टक्के कर्जवितरण केले आहे. खरिपासाठी निर्धारित लक्ष्यांकापैकी अद्याप ४३३ कोटी रुपयांचे कर्जवाटप शिल्लक आहे.
खासगी बँकेकडून केवळ २७ टक्के वितरण
खासगी बँकेने ७३.७५ कोटी रुपयांचे लक्ष्यांक ठेवले असताना केवळ २७ टक्के म्हणजे १९.९८ कोटी रुपये कर्जवितरण केले आहे. तर, राष्ट्रीय बँकांनी ५६ टक्के लक्ष्य गाठत ७९३.७५ कोटी रुपयांपैकी ४४४.०४ कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. या बँकांचे ३४९ .७१ कोटी रुपये शिल्लक आहेत. एकूण ४३३ कोटी रुपये वाटप झालेले नाहीत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.