Kisan Long March : दादा भुसे आणि अतुल सावे यांची किसान सभेच्या नेत्यांशी रात्री उशिरा चर्चा

अखिल भारतीय किसान मोर्चाच्या वतीने मुंबईकडे निघालेल्या मोर्चाने अवघड कसारा घाट उतरून मुंबईकडे कूच केली.
Kisan Long March
Kisan Long MarchAgrowon

Mumbai News : अखिल भारतीय किसान मोर्चाच्या (Kisan Sabha) वतीने मुंबईकडे निघालेल्या मोर्चाने (Kisan Long March) अवघड कसारा घाट उतरून मुंबईकडे कूच केली.

दरम्यान मंगळवारी (ता.१४) अचानक बैठक रद्द केल्याने संतप्त आंदोलकांनी ‘चर्चाच करायची असेल तर आमच्यापर्यंत या’ असा निरोप दिला.

त्यामुळे बुधवारचीही (ता.१५) बैठक रद्द झाली. दरम्यान, मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि सहकारमंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी रात्री उशिरा आंदोलकांशी चर्चा केली.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिक येथून सोमवारी (ता.१३) लाँग मार्चला सुरूवात झाली. हा लाँग मार्च अधिवेशनादरम्यान विधानभवनावर धडकेल, असा इशारा आंदोलकांनी दिला.

कांदा उत्पादकांना ६०० रुपये अनुदान आणि पुढील हंगामात दोन हजार रुपये हमीभावासह मागण्यांसाठी काढण्यात आलेला हा मोर्चा मंगळवारी रात्री कसारा घाटाच्या सुरुवातीच्या घाटनदेवी परिसरात आला.

Kisan Long March
kisan Long March : आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करून सरकारने प्रश्न सोडवावा: अजित पवार

रात्री साडेअकरा वाजता आंदोलक विश्रांतीसाठी थांबले. पहाटे पुन्हा मुंबईच्या दिशेने मोर्चा निघाला. दुपारी तीन वाजेपर्यंत २५ ते ३० किलोमीटरचे अंतर या मोर्चाने कापले. अवघड कसारा घाट उतरल्यानंतर खर्डी येथे आंदोलकांनी काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

मंगळवारी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने बैठक बोलविली होती. मात्र, या बैठकीला जे मंत्री येणार होते त्यापैकी काही अनुपस्थित राहणार असल्याने बैठक रद्द करण्यात आली.

या विषयावर विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसच्या नाना पटोले यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर बुधवारी (ता.१५) सरकारी पातळीवर बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन विधानसभेत सरकारच्या वतीने देण्यात आले.

Kisan Long March
Kisan Long March : राज्य सरकार किसान सभेशी उद्या चर्चा करणार; आजची बैठक अचानक रद्द

या बैठकीचा निरोप आंदोलक नेते आमदार जिवा गावित यांना देण्यात आला. मात्र, मंगळवारी निमंत्रण देऊनही अचानक बैठक रद्द केली आहे. जर सरकारला खरोखरच चर्चा करायची असेल तर सरकारने आमच्याशी आंदोलनस्थळी चर्चा करावी, असा उलट निरोप दिला. त्यामुळे सरकारने भुसे आणि सावे यांना चर्चेसाठी पाठविले.

३० हजार शेतकरी

नाशिकहून जवळपास १० हजार शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा कसारा घाटाकडे जात असताना ही संख्या जवळपास २० हजारांवर गेली. कसाऱ्याजवळ आल्यानंतर या मोर्चात नगर, नांदेड येथील शेतकरी सहभागी झाले. शिवाय, पालघर जिल्ह्यातील शेतकरीही सहभागी झाल्याने ही संख्या ३० हजारांवर गेल्याचा दावा आंदोलकांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com