Pune Dam : खडकवासला, कळमोडी धरण शंभर टक्के भरले

Khadakwasla Dam Water Level : सतरा धरणांत ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा
Khadakwasla Dam
Khadakwasla DamAgrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा
Kalmodi Dam : पुणे : जिल्ह्यात अनेक भागांत पावसाची संततधार सुरू आहे. पश्‍चिम पट्ट्यातील धरण क्षेत्रात आणि घाट माथ्यावर पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढत आहे. खडकवासला आणि कळमोडी धरण भरले असून, त्यातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तर जिल्ह्यातील १७ धरणांत ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे, अशी माहिती जल संपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात एकूण २६ धरणे आहेत. यात उजनी धरणाचाही समावेश आहे. घाट माथ्यावर जोरदार पाऊस पडल्याने या धरणातील पाणीसाठा वाढला आहे. बुधवारी (ता. २६) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये वळवण घाट माथ्यावर सर्वाधिक ११८ मिलिमीटर पाऊस पडला. तर मुळशी, लोणावळा, शिरोटा, कुंडली, ठोकरवाडी या घाट माथ्यावर जोरदार पाऊस पडला. त्यामुळे मुळशी, लोणावळा या धरणात १.८२ टीएमसी पाण्याची आवक झाली. धरण क्षेत्रात देखील पाऊस बऱ्यापैकी होता. नीरा देवघर धरण क्षेत्रात ७७ मिलिमीटर पाऊस पडला. तर पवना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला.

Khadakwasla Dam
Kalmodi Dam : कळमोडी धरण शंभर टक्के भरले

टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला, पवना, कासारसाई, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, वडिवळे, शेटफळ, गुंजवणी, भाटघर, घोड धरणक्षेत्रात मध्यम पाऊस पडला. तर वीर, पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, चिल्हेवाडी, घोड, विसापूर, खडकवासला या धरणक्षेत्रात हलका पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांत मागील २४ तासांत उच्चांकी ९.४५ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. एक जून ते २५ जुलै या काळात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यांतील धरणसाठा ८९.३३ टीएमसीपर्यंत पोहोचला आहे.

Khadakwasla Dam
Bhushi Dam : लोणावळ्यातील भुशी धरण भरले

५० टक्क्यांपेक्षा अधिक भरलेली धरणे (पाणीसाठा टीएमसी) ः
वरसगाव, पानशेत, खडकवासला, पवना, कासारसाई, कळमोडी, भामा आसखेड, आंध्रा, वडिवळे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर, येडगाव, वडज, डिंभे, चिल्हेवाडी, मुळशी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com