Kalmodi Dam : कळमोडी धरण शंभर टक्के भरले

Pune Dam Water Status : खेड तालुक्याच्या पश्चिम घाट परिसरातील आरळा नदीवरील कळमोडी धरण शंभर टक्के भरले असून, पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे
Kalmodi Dam
Kalmodi DamAgrowon
Published on
Updated on

Pune Dam Water Level News: खेड तालुक्याच्या पश्चिम घाट परिसरातील आरळा नदीवरील कळमोडी धरण शंभर टक्के भरले असून, पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मागील वर्षी ११ जुलै रोजी धरण शंभर टक्के भरले होते, मात्र या वर्षी धरण सहा दिवस उशिरा म्हणजे १७ जुलै रोजी भरले आहे.

खेड तालुक्यातील विविध गावांसह आंबेगाव तालुक्याच्या सातगाव पठार भागास वरदान ठरणारे हे धरण सोमवारी (ता.१७) रोजी रात्री भरताच धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली. या धरणात २०१० पासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होण्यास सुरुवात झाली आहे.

Kalmodi Dam
Dam Water Pune : पुणे जिल्ह्यात जून महिन्यात साडेसहा टीएमसी पाणीसाठा

कळमोडी धरण परिसरात पावसाचा जोर गेल्या आठ दिवसांपासून वाढला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील परिसरात पावसाचा जोर चांगला राहिल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होवून धरण शंभर टक्के भरले.

धरणाच्या सांडव्यावरून २११ क्युसेक वेगाने पाणी नदीपात्रात विसर्ग होत असून पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वेगाने होणार असल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती धरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

उपविभागीय अभियंता डी. एस. डिग्गीकर, सहाय्यक अभियंता एस. एस. सुसुंद्रे, कर्मचारी रोहिदास नाईकडे, संभाजी बोंबले, शांताराम सातपुते हे धरणावर चोवीस तास लक्ष ठेवून आहेत. धरणात ४२.८७ दलघमी म्हणजेच १.५१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

Kalmodi Dam
Pune Khadakwasla Dam : पुण्याला पाणी देणाऱ्या खडकवासलामध्ये अद्यापही खडखडाट

धरण परिसरात एक जूनपासून ४२८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. कळमोडी धरण भरल्याने या धरणातून बाहेर पडणारे पाणी चास कमान धरणात येत असल्याने चास कमान धरणातील पाणीसाठा वेगाने वाढण्यास मदत होणार आहे.

या बाबत बोलताना कळमोडी प्रकल्प संघ समितीचे अध्यक्ष व माजी सरपंच बाळासाहेब गोपाळे म्हणाले, की चिखलगाव, साकुर्डी देवोशी, कुडे, योणिये, बांगरवाडी या गावांना या धरणाच्या पाण्याचा प्रत्यक्ष फायदा होत असून पश्चिम भागातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना या कळमोडी प्रकल्पावर अवलंबून असल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुद्धा या निमित्ताने सुटला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com