Kesar Mango : सातपुड्याच्या पायथ्याशी केसर आंब्याची विक्री

Mango : बागांमधील आंबा विक्रीसाठी तयार
Kesar Mango
Kesar Mango Agrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा
Kesar Mango Production : तळोदा, जि. नंदुरबार ः नंदुरबार जिल्ह्यात तळोदा, शहादा, अक्कलकुवा व गुजरातमधील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बागांमधील केसर आंबा (kesar mango) आता सर्वत्र उपलब्ध झाला असून, केसरचा गोडवा चाखण्यासाठी तालुक्यातील खवय्ये गोपाळपूर, प्रतापपूर, रांझणी, पाडळपूर परिसर गाठून केसर आंबा खरेदी (Mango) करीत आहेत.

त्याचप्रमाणे जिल्ह्यासोबतच इतर राज्यांतील व्यापारीदेखील आंबा खरेदीसाठी येत आहेत.

तळोदा तालुक्यात शंभर हेक्टरवर आंबा बागा असून, यात मुख्यत्वे गोपाळपूर, प्रतापपूर, रांझणी येथील केसर आंबा परिसरात प्रसिद्ध आहे.

दर वर्षी अक्षय तृतीयेपासून बाजारात दाखल होणारा केसर आंबा या वर्षी काहीसा उशिरा दाखल झाला असून, यातच गोपाळपूर येथील केसर आंब्याला विशेष मागणी आहे.

गोपाळपूर येथील केसर आंबा सेंद्रिय खत, जैविक खते, झाडांची वेळोवेळी राखण्यात येणारी निगा यामुळे वैशिष्ट्यपूर्ण असून, निव्वळ सेंद्रिय पद्धतीनेच उत्पादित करण्यात येत असल्याने प्रसिद्ध आहे.

Kesar Mango
Kesar Mango : हापूस आंब्याची कसर केसर भरुन काढणार

हा केसर आंबा लांबट असून, जाडीला पण आहे तसेच चवीला अतिशय गोड आहे. त्याची टिकून राहण्याची क्षमता जास्त आहे. त्यामुळे त्याची तुलना कोकणातील आंब्यासोबत करण्यात येते.

तसेच ही केसर प्रजात सातपुड्यातील अनमोल ठेवा असून, यात कोणत्याही प्रकारचे कलम किंवा सरमिसळ नसल्याने त्याची चव वेगळी आणि गोड आहे. सध्या आंब्याच्या हंगाम असल्याने खवय्ये आंब्याच्या खरेदीसाठी या बागांच्या परिसरामध्ये गर्दी करीत आहेत.

Kesar Mango
Kesar Mango Market : केसर आंब्यांचे दर टिकून

नंदुरबार जिल्ह्यात १५७६.५० हेक्टरवर आंबा बागा असून, त्यात अक्कलकुवा तालुक्यात ६४२, नवापूर तालुक्यात ५६४, धडगाव तालुक्यात ३५०, तर तळोदा तालुक्यात १०० हेक्टरवर आंबा बागा आहेत.

यात घराच्या परसबागेतील तसेच शेतीबांधावरील आंब्यांची मोजदाद नसून तळोदा तालुक्यात घेण्यात येणाऱ्या आंबा उत्पादनापैकी जवळपास ४० टक्के उत्पादन गोपाळपूर, प्रतापपूर, रांझणी, पाडळपूर शिवारातून होत असते.

आंब्याचे ब्रॅन्डिंग व्हावे
तळोदा तालुक्यात केसर आंब्याचे बऱ्यापैकी उत्पादन घेतले जाते. त्यामुळे आंबा उत्पादन विकासासाठी तसेच आंब्याच्या विक्रीसाठी योग्य त्या सोयी उपलब्ध झाल्यास, तालुक्यातील केसर आंबा उत्पादनवाढीस आणखी मोठी मदत होणार असल्याचे बोलले जाते.

कोकणातील आंब्यासोबत स्पर्धा करणाऱ्या या परिसरातील आंब्याचे ब्रॅन्डिंग व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


अवकाळी पाऊस व वेगवान वाऱ्यांमुळे आंबा बागांचे काही प्रमाणात नुकसान झाले असून, सध्या बागांमधील आंबा परिपक्व झाला असून, विक्रीसाठी उपलब्ध आहे.


- युसूफभाई असगरभाई रायन, व्यापारी, बारडोली (जि. नर्मदा, गुजरात)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com