मसाला उद्योगाने 'ब्रँड इंडिया'वर भर देण्याची गरज

भारताने शाश्वत आणि सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या मसाल्यांच्या जागतिक बाजारातील पुरवठ्यावर भर द्यायला हवा. विशेषतः युरोपियन युनियन (EU)आणि इतर देश अलीकडील काळात सेंद्रिय उत्पादनांबाबत अधिक सजग,जागरूक बनले आहेत.
Indian Spices
Indian SpicesAgrowon
Published on
Updated on

भारतीय मसाला (Indian Spices)व्यापारात वर्षाकाठी सरासरी १९.५ टक्क्यांची वाढ झाली तरच २०२७ अखेरीस भारताला १० अब्ज डॉलर्स निर्यातीचे उद्दिष्ट गाठता येणे शक्य होणार आहे. त्यामुळेच भारताने कोविडनंतरच्या ट्रेंडचा विचार करून ब्रँड इंडियावर भर देण्याची गरज ड्रीप कॅपिटल आयएनसीने आपल्या कमोडिटी विश्लेषण अहवालात व्यक्त केली आहे.

मसाला निर्यातीचे उद्दिष्ट साध्य करण्याचा एक मार्ग म्हणजे भारताला मसाल्याची संयुक्त उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात करावी लागतील. ज्यामुळे भारताला मसालायुक्त कॉफी, मसालायुक्त व्हिस्की, मल्ड वाईन सारख्या उत्पादनांची मागणी पुरवता येणे शक्य होणार आहे.

याशिवाय देशाने मसाला व्यापारातील नव्या प्रवाहाचा विचार करायला हवा. भारताने शाश्वत आणि सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या मसाल्यांच्या जागतिक बाजारातील पुरवठ्यावर भर द्यायला हवा. विशेषतः युरोपियन युनियन (EU)आणि इतर देश अलीकडील काळात सेंद्रिय उत्पादनांबाबत अधिक सजग,जागरूक बनले आहेत. मसाल्याच्या वाढत्या वापरासाठी शाकाहाराच्या प्रसारावरही लक्ष केंद्रित करायला हवे.

व्यवसायवाढीसाठी मसाला उद्योग क्षेत्राने मसाल्यांच्या वैद्यकीय गुणधर्मावर आणि आरोग्यावरील संभाव्य सकारात्मक परिणामांवर लक्ष केंद्रीत करायला हवे. हळद, दालचिनी, आल्यासारख्या मसाल्यांतील वैद्यकीय गुणधर्मांचा विचार करायला हवा. आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उपचारपद्धतीस प्राधान्य देणाऱ्या देशांमध्ये निर्यात वाढवायला हवी. याशिवाय फार्मास्युटिकल्स आणि न्यूट्रस्युटिकल्स उत्पादन क्षेत्राकडूनही सिंथेटिक रसायनांऐवजी नैसर्गिक मसाल्यांना प्रोत्साहन देण्याची गरज मुकेवार यांनी व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी पूर्ण करण्यासाठी भारताने संयुक्त मसाला उत्पादनांवर भर देण्याची गरज ड्रीप कॅपिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कर मुकेवार यांनी व्यक्त केली. भारताने 'ब्रँड इंडिया'वर भर द्यायला हवा. भारत इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्डीसेशनच्या यादीतील मसाल्याच्या १०९ प्रकारांपैकी भारत ७५ प्रकारच्या मसाल्यांचे उत्पादन घेतो. यातील ८० टक्के मसाल्यांचा मसाले देशांतर्गत मागणी पुरवण्यासाठी केला जातो. तर केवळ १५ ते २० टक्के मसाल्यांची निर्यात केली जाते.

२०२२ मध्ये देशाने ४.१८ अब्ज डॉलर्सचे मसाले निर्यात केले आहेत. ज्यातील बहुतांशी निर्यात ही लाल मिरची, जिरे आणि हळदीची आहे. त्याखालोखाल मिंट प्रोडक्टस, मसाला तेल आणि ओलेओरेसीन्सचा क्रमांक लागत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यासाठी ड्रीपने परराष्ट्र व्यापार महासंचलनालयाचा दाखला दिला आहे.

Indian Spices
सगळ्यांनाच हवाय विषमुक्त जिरा

२०२१ मध्ये भारताने १.७८ अब्ज डॉलर्सचे मसाले निर्यात केले होते. २०२० मध्ये हे प्रमाण १.२ अब्ज डॉलर्सवर होते. कोविड १९ च्या प्रादुर्भावानंतर आयुर्वेद आणि परंपरागत भारतीय खाद्यपदार्थांकडे ओढा वाढला. त्यामुळे निर्यातीला अनुकूल वातावरण तयार झाले.

चीन आणि अमेरिका हे देश भारतीय मसाल्यांचे हक्काचे खरेदीदार देश समजले जातात. चीन भारताकडून चिली, क्युमिन आणि मिंट प्रोडक्टस खरेदी करते तर अमेरिका भारताकडून करी पावडर, पेस्ट्स , स्पाईस ऑइल आणि ओलेओरेसीन्स मागवत असते. याखेरीज बांगलादेश भारतातून हळद आणि जिऱ्याची आयात करतो. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरातीकडून भारतीय वेलची खरेदी केली जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com