Sukhdev Gurve : लॉटरीच्या २५ लाख रुपयांतून २८ मुलींचे कन्यादान

Latest Marathi News : धार्मिकवृत्तीचे असलेल्या सुखदेव गुरवे यांची धारणा आहे, की नोकरीच्या ठिकाणी असलेल्या शिवमंदिरात त्यांनी स्वच्छता आणि पूजन केले.
Sukhdev Gurve
Sukhdev GurveAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : नैसर्गिक शेतीचा आदर्श सांगणाऱ्या करंभाड (ता. पारशिवनी, जि. नागपूर) येथील सुखदेव पांडुरंग गुरवे व त्यांच्या पत्नी शकुनी यांनी लॉटरीत लागलेल्या २५ लाख ५० हजार रुपयांच्या रकमेतून तब्बल २८ गरजू मुलींच्या लग्नाची जबाबदारी पार पाडत त्यांच्या कन्यादानाचा हक्‍क बजावला. त्यांद्वारे आजही हे सेवाकार्य सुरू असून, त्यांच्या दातृत्वाबद्दल त्यांचे सर्वदूर कौतुक होत आहे.

पारशिवनी तालुक्‍यातील करंभाड येथील रहिवासी असलेले सुखदेव गुरवे हे भारत सरकारअंतर्गत येणाऱ्या वेस्टर्न कोलफिल्डमध्ये नोकरीला होते. धार्मिकवृत्तीचे असलेल्या सुखदेव गुरवे यांची धारणा आहे, की नोकरीच्या ठिकाणी असलेल्या शिवमंदिरात त्यांनी स्वच्छता आणि पूजन केले. त्यामुळेच त्यांना लॉटरी लागली. २००९ मध्ये महाराष्ट्र राज्य लॉटरीचे २१ लाख रुपयांचे बक्षीस लागली.

Sukhdev Gurve
Dryland Agriculture : कोरडवाहू शेतीमध्ये आपत्कालीन पीक नियोजनाबद्दल मार्गदर्शन

२०१० मध्ये ५० हजार, तर २०११ मध्ये तब्बल पाच लाख रुपयांची लॉटरी त्यांना लागली. ही सारी रक्‍कम देवाने आपल्याला सेवाकार्यासाठी उपलब्ध करून दिली या भावनेतून त्यांनी या रक्‍कमेचा विनियोग सेवाभावी उपक्रमासाठी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २००९ पासून आजवर त्यांनी स्वखर्चातून गरजू कुटुंबातील तब्बल २८ मुलींचे विवाह लावून दिले आहेत.

त्याकरिता शेतातच त्यांनी वर-वधुसाठी दोन खोल्याही बांधल्या आहेत. वधूचे पालक आल्यास आणि त्यांची इच्छा असल्यास लग्न लावून दिले जाते. २०० पाहूणे वराकडील तर तितकेच वधूकडील आणि १०० पाहूणे हे गुरुवे यांच्याकडील राहतात. अशाप्रकारे ५०० पाहुण्यांच्या जेवणाची सोय ते स्वखर्चाने करतात. आज सेवानिवृत्तीनंतर वधूपालकांची इच्छा असल्यास ते या कार्यासाठी पुढाकार घेतात.

Sukhdev Gurve
Agriculture Department : नऊ लाख शेतकऱ्यांसाठी केवळ ३२३ कृषी सहायक

नैसर्गिक शेतीतील उत्पादकता

गुरवे यांच्याकडे ९ एकर शेती असून या क्षेत्रात नैसर्गिक शेतमाल उत्पादनावर त्यांचा भर आहे. याची विक्री आणि ब्रॅण्डिंगही ते करतात. त्याच्या दर्जाविषयी कल्पना असल्याने त्यांच्या घरूनच अनेकजण शेतीमाल खरेदी करतात. केळी, तूर व हरभरा डाळ अशा उत्पादनांचा त्यामध्ये समावेश आहे.

२००९ ते २०११ अशी सलग तीन वर्षे लॉटरी लागली. त्यातून २५ लाख ५० हजार रुपये मिळाले. ही रक्‍कम ईश्‍वराने आपल्याला सेवाकार्यासाठीच उपलब्ध करून दिली असे मानत गरजू कुटुंबातील मुलींचे विवाहाला सुरुवात केली. आज या कार्यातून मोठे समाधान मिळत आहे.
- सुखदेव गुरवे मो. ८९५९७६०४५६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com