Heavy Rainfall : जळगाव जिल्ह्यात १०९ टक्के पावसाची नोंद पाणीटंचाई मिटली

परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान, नद्या अजूनही वाहत असल्याचे चित्र
Heavy Rainfall
Heavy RainfallAgrowon

जळगाव ः जिल्ह्यात यंदा मॉन्सून (Monsoon Rain) दीड महिना उशिराने दाखल झाला होता. परतीचा पाऊस ऑक्टोबरच्या सुरुवातीला होऊन मॉन्सूनने निरोप घेण्याची वेळ होती. मात्र ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस (Heavy Rainfall) तब्बल १५ दिवस कमी-अधिक प्रमाणात बरसला. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत १०९ टक्के पाऊस झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने केली आहे.

Heavy Rainfall
Heavy Rainfall : पाचोऱ्यात पावसाने नुकसान

पंधरापैकी भुसावळ, पारोळा, धरणगाव, बोदवड या चार तालुक्यांत शंभर टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. उर्वरित अकरा तालुक्यांत शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले असले, तरी जिल्ह्यातील पाणीटंचाई मिटली आहे. नद्या अजूनही वाहत असल्याचे चित्र सर्वत्र आहे.

जिल्ह्यात दोन वर्षांपासून चांगला पाऊस होत आहे. गेल्या वर्षी तर पावसाने कापसाचे मोठे नुकसान केल्यामुळे कापूसटंचाई निर्माण झाली होती. यंदा जूनमध्ये काही प्रमाणात पाऊस झाला. नंतर मात्र पावसाने महिन्याभराची दडी मारली. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. यात शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. मात्र पुन्हा दडी मारली. कमी-अधिक प्रमाणात पाऊस ऑगस्ट, सप्टेंबर मध्यापर्यंत सुरू होता. सरासरीच्या ९० टक्के पाऊस या वेळेपर्यंत झाला. नंतर मात्र पावसाचा जोर कायम राहिला. नंतर काही दिवसांच्या खंडानंतर परतीचा पाऊस १९ ऑक्टोबरपर्यंत सुरूच होता. आता गेल्या दोन दिवसांपासून पाऊस नाही. हवामानतज्ज्ञांच्या मते मॉन्सून आता माघारी फिरला आहे.

यंदा परतीचा मॉन्सून तब्बल पंधरा ते वीस दिवस लांबला होता. एरवी ऑक्टोबरमध्ये पहिल्या आठवड्यात (पाच ते सहा तारखेपर्यंत) मॉन्सून परततो. यंदा अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा मुक्काम वाढला. हा पाऊस पिकांसाठी नुकसानकारक ठरला असला, तरी उशिराने पेरण्या केलेल्यांसाठी तो फायदेशीर ठरला आहे. कापसाचे १० ते १५ टक्के नुकसान झाले. केळी, सोयाबीनचेही नुकसान आहे.

चांगल्या पावसाने जिल्ह्यातील पाणीटंचाई मिटली आहे. सिंचन प्रकल्पात चांगला पाणीसाठा आहे. यामुळे रब्बीचा हंगाम जोरदार येईल. थंडी मोठ्या प्रमाणात पडेल. खरिपाच्या नुकसानीची भर रब्बीत भरून निघेल, असा अंदाज आहे. सर्वाधिक पाऊस चाळीसगाव तालुक्यात १३५.५ टक्के, तर सर्वांत कमी बोदवड तालुक्यात ८३.२ टक्के झाला आहे.

तालुकानिहाय पाऊस

तालुका टक्केवारी

जळगाव १०६.८

भुसावळ ९५.१

यावल ११४.५

रावेर १०४.८

मुक्ताईनगर ११५.६

अमळनेर १०३.४

चोपडा १०९.८

एरंडोल ११३.५

पारोळा ९०.१

चाळीसगाव १३५.५

जामनेर १०२.२

पाचोरा ११७.५

भडगाव १२९.३

धरणगाव ९४.४

बोदवड ८३.२

एकूण १०९.७

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com