Monsoon : ‘मॉन्सून’च्या पावसावर ‘एल निनो’ प्रभाव ठरवणे घाईचे

मॉन्सून पावसासाठी ‘आयओडी’ महत्त्वाचा : हवामान तज्ज्ञांचे मत
Monsoon
MonsoonAgrowon

पुणे : विषुववृत्तीय प्रशांत महासागरात सलग तीन वर्षे असलेली ‘ला-निना’ (Al Nina) निवळत आहे. मॉन्सून हंगामात ‘एल-निनो’ची (AL Nino) स्थिती राहण्याची शक्यता अमेरिकेतील नॅशनल ओशिनिक अँड ऑटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (नोआ) या संस्थेने व्यक्त केली आहे.

मात्र यामुळे भारतातील मॉन्सूनच्या पावसावर परिणाम होईल का? याबाबत आताच बोलणे घाईचे ठरेल, असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

‘नोआ’ या अमेरिकेतील हवामान संस्थेने या वर्षी एन्सो (एल -निनो साऊथ ऑसिलेशन) म्हणजेच एल-निनोचे पॅसिफिक समुद्रात पूर्व व मध्य विषुववृत्त दरम्यान अस्तित्व व सक्रियता असण्याची शक्यता अधिक म्हणजे ६० टक्के असण्याची शक्यता वर्तविली आहे.

प्रशांत महासागरातील ‘ला- निना’ आणि ‘एल-निनो’ या दोन्ही स्थितींचा भारतातील मॉन्सूनवर प्रभाव पडतो, असे मानले जाते. त्यामुळे संभाव्य ‘एल-निनो’मुळे भारतात पाऊस कमी पडून दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची चर्चा सुरू झाली आहे.

Monsoon
एल निनो म्हणजे नेमके काय ?

जानेवारी महिनाअखेरीस झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महोपात्रा यांनी प्रशांत महासागरातील ‘ला निना’ स्थिती निवळत आहे.

मॉन्सून हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात सौम्य ‘एल-निनो’ स्थिती तयार होण्याचे संकेत असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र त्याबद्दल आताच बोलणे घाईचे ठरेल, असे मत देखील डॉ. महोपात्रा यांनी व्यक्त केले होते.

‘हवामान निरीक्षणासाठी दोन महिने’
हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे म्हणाले, ‘‘‘एल-निनो’च्या सकारात्मकतेमुळे जर कदाचित या वर्षी २०२३ चा जूनपासून भारतीय उपखंडात सुरू होणाऱ्या मोसमी पावसावर ऑगस्ट २०२३ नंतर तो नकारात्मक परिणाम घडवून आणण्याची शक्यता नकळत वर्तवली जात आहे.

मात्र देशात या वर्षी दुष्काळ किंवा टंचाईसदृश स्थिती असेल, यावर शिक्कामोर्तब होण्यास जागतिक हवामान निरीक्षणासाठी आणखी २ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.

‘एल -निनो’च्या अस्तित्वामुळे भले पावसाचे प्रमाण काहीसे कमी असेल, म्हणजे देशात दुष्काळच पडेल किंवा सरासरीपेक्षा कमीच पाऊस पडेलच असेही नाही.’’

Monsoon
Monsoon IMD: मॉन्सून आणि राजकारण यांचा संबंध काय ?

भारतीय महासागरीय द्वि-ध्रुविता (इंडियन ओशन डायपोल) म्हणजेच अरबी व बंगाल उपसागरातील पाण्याच्या पृष्ठभागाच्या तापमानातील फरक ‘धन’ किंवा ‘ऋण’, किंवा ‘तटस्थ’ अवस्थेत आहे.

त्यावरून भारत देशाच्या पावसाळी हंगामावर त्याचा सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम करणार आहे, हे ठरवले जाते. ‘आयओडी’ची धन अवस्था पावसाळी हंगामावर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या मूळ ‘एल - निनो’च्या प्रभावाला मारक ठरू शकते.

त्या वर्षी ‘एल-निनो’ असूनही देशात चांगला पाऊस पडतो. त्याचा ऊहापोह झालेला दिसत नाही म्हणून ‘एल-निनो’चा देशाच्या पावसावर विपरीत परिणाम होईल, हा आज काढलेला निष्कर्ष आज तरी निराधार असल्याचे खुळे यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com