Processed Honey Products : मध प्रक्रियायुक्त उत्पादनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी

मधाची देशात मोठी उलाढाल होते. मात्र, प्रक्रिया केलेली उत्पादने कमी प्रमाणात आहेत.
Honey Processing
Honey ProcessingAgrowon
Published on
Updated on

Pune News ‘‘मधाची देशात मोठी उलाढाल होते. मात्र, प्रक्रिया केलेली उत्पादने (Processed Honey Products) कमी प्रमाणात आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर मधावर प्रक्रिया (Honey Processing) केलेल्या उत्पादनाला चांगली मागणी आहे.

त्यामुळे मधमाशीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगाकडे वळले पाहिजे,’’ असे मत दिल्लीचे राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी व्यक्त केले.

केंद्रीय मधमाशीपालन संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेला सक्सेना यांनी शुक्रवारी (ता.७) भेट दिली. यावेळी खादी व ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनितकुमार, संस्थेचे प्राचार्य ....बसवराज, सहाय्यक संचालक विजेंद्र सिंग, यु. एस. कोळी, विवेक भगत, डॉ. डेजी थॉमस, डॉ. सुनील पोकरे आदी उपस्थित होते. यावेळी प्रशिक्षणार्थींना व सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

Honey Processing
Honey Bee Keeping : मधमाशीपालन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?

सक्सेना म्हणाले, ‘‘मधमाशीपालन हा शेती पूरक व्यवसाय असल्याने देशातील अनेक शेतकरी याकडे वळत आहेत. त्यातून शेतकरी चांगले उत्पादन घेत आहेत.

आगामी काळात हा व्यवसाय वाढीस लागण्यासाठी शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाच्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. पुण्यातील ही संस्था एकमेव असली तरी यात आणखी सुधारणा होण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल.’’

Honey Processing
Honey Production : पाटगावच्या मधाचा गोडवा जगभर पसरणार

‘‘मधमाशीपालन हा शेतीपूरक व्यवसाय आहे. देशात सर्वाधिक रोजगार निर्मिती करणारा हा व्यवसाय आहे.

आजही देशात सुमारे तीन हजार ३०० शेतकरी या व्यवसायाशी जोडले आहेत. ते दर महिन्याला दोन लाख रुपयांचे उत्पादन घेऊन चांगला आर्थिक नफा मिळवीत आहेत. देशात चांगल्या प्रतीच्या मधाची आवश्यकता आहे.

परंतु काही भागामध्ये शेतकरी चुकीच्या पद्धतीने मध काढत असल्याने चांगल्या दर्जाचे मधाचे उत्पादन मिळत नाही. त्याकरिता शास्त्रीय पद्धतीने प्रशिक्षणार्थींना चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण दिल्यास मधाची गुणवत्ता टिकवण्यास मदत होईल.

‘रिक्त जागा भरण्याची मंजुरी द्यावी’

विनितकुमार म्हणाले, ‘‘मधमाशीपालनाचे प्रशिक्षण देत असताना अनेक अडचणी येतात. त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. रिक्त जागांची संख्या वाढत आहे. येत्या काळात या रिक्त जागा भरण्यासाठी शासनाने मंजुरी द्यावी.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com