Cotton Cultivation : कापूस पिकातील सघन लागवड फायद्याची

कापूस पिकातील सघन लागवड पद्धत फायद्याची असल्याचे प्रतिपादन नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी आणि कापूस पैदासकार डॉ. के. एस. बेग यांनी केले.
Cotton Cultivation News
Cotton Cultivation NewsAgrowon
Published on
Updated on

Jalna News कापूस पिकातील सघन लागवड (Cotton Cultivation) पद्धत फायद्याची असल्याचे प्रतिपादन नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी आणि कापूस पैदासकार डॉ. के. एस. बेग यांनी केले.

खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने शुक्रवारी (ता. ५) कृषी विज्ञान मंडळाच्या ३०९ व्या मासिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होत. त्या प्रसंगी डॉ. बेग बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक कृषिरत्न विजय बोराडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कापूस संशोधन केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. व्ही. व्ही. भेदे आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ एस. व्ही. सोनुने यांचीही उपस्थिती होती.

Cotton Cultivation News
Cotton Market : वायद्यांमध्ये कापूस दरात सुधारणा

डॉ. बेग म्हणाले, की गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी कापूस पिकातील फरदड घेण्याचे टाळावे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात पऱ्हाट्या उपटून बाजूला कराव्यात. त्यामुळे गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र खंडित होईल.

कपाशीची लागवड जून महिन्यात १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर करावी. सघन लागवडीसाठी बीटी कपाशीची लागवड ३ बाय १ फुटावर करून एकरी १५ हजार ५०० झाडे ठेवावीत.

Cotton Cultivation News
Cotton Market: कापसाचे भाव कोणकोणत्या देशात वाढले?

कापूस पिकाचे अधिक उत्पादन देणारे वाण, खते आणि पाणी व्यवस्थापन या विषयी डॉ. बेग यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

चीनची कापूस उत्पादकता ६२९ किलो रुई प्रति हेक्टर असताना त्या तुलनेत जालना जिल्ह्याची उत्पादकता ही फक्त ३१४ किलो रुई प्रति हेक्टर असल्यामुळे आपणास कापूस पिकाची उत्पादकता वाढविण्याची संधी असून, त्या संदर्भात शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादकतेत वाढ करावी, असे आवाहन कापसे यांनी केले.

कृषी विज्ञान मंडळ हे शेतकऱ्यांचे हक्काचे व्यासपीठ असून, त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे प्रतिपादन विजय बोराडे यांनी केले. कापूस पिकाचे मागील वर्षी एकरी २० क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन घेणाऱ्या जगदीश जाधव (कचरेवाडी, ता. जालना) आणि नामदेव माथने (मोसा, ता. मंठा) यांनी आपले अनुभव कथन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com