
पुणे : पूर्व विदर्भासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा जोर (Rain Force) काहीसा वाढला आहे. उर्वरित राज्यातही हलका ते मध्यम पावसाच्या सरी (Rain Update) पडत आहेत. आज (ता. २४) पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता (Heavy Rainfall Forecast) आहे. उत्तर कोकणाच्या घाटमाथ्यावर, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.
शनिवारी (ता. २३) राज्यात ढगाळ हवामानासह उकाड्यात वाढ झाली होती. विदर्भ, मराठवाड्यात पावसाने जोर धरल्याचे दिसून आले. आज (ता. २४) पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, उत्तर कोकणातील पालघरसह, नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर पूर्व विदर्भातील अकोला, नागपूर, मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा काहीसा दक्षिणेकडे सरकला असून, राजस्थानच्या बिकानेरपासून ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. ओडिशा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. कर्नाटकपासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
पालघर, नाशिक, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.
विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :
नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, अकोला, नागपूर.
विदर्भात पावसाचा जोर
गेल्या काही दिवसांपासून उघडीप देणाऱ्या पावसाने विदर्भात पुन्हा जोर धरला आहे. शनिवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. गडचिरोली येथे १३० मिलिमीटर, तर चंद्रपुरातील मूल येथे १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या.
राज्यात शनिवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :
कोकण : कर्जत, महाड प्रत्येकी ३०, संगमेश्वर, वैभववाडी, पोलादपूर, दापोली, जव्हार, लांजा प्रत्येकी २०.
मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर ६०, लोणावळा, तळोदा प्रत्येकी ३०, शहादा, अक्कलकुवा, इगतपुरी, गगनबावडा, अक्रणी प्रत्येकी २०.
मराठवाडा : उमरगा ८०, निलंगा ६०, उदगीर, औसा प्रत्येकी ४०, लोहारा, देवणी, माहूर प्रत्येकी ३०, किनवट, मुखेड, जळकोट, शिरूर अनंतपाळ, हिमायतनगर, तुळजापूर प्रत्येकी २०.
विदर्भ : गडचिरोली १३०, चामेर्शी १००, मूल ८०, गडचिरोली ७०, मूलचेरा, आरमोरी, अर्णी ६०, चिखलदरा, वरोरा, भद्रावती, देसाईगंज प्रत्येकी ५०, भामरागड, बल्लारपूर, गोंदिया, अहिरी, वणी, चिमूर, पोम्बर्णा, चंद्रपूर, गोंडपिंपरी, शिंदेवाही, धानोरा प्रत्येकी ४०.
घाटमाथा :
दावडी ६०, डुंगरवाडी, ताम्हिणी प्रत्येकी ५०, शिरगाव ४०, लोणावळा, वळवण, कोयना (नवजा) खोपोली प्रत्येकी ३०.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.