Rain Update : धरणक्षेत्रात पावसाचा जोर ओसरला

Monsoon Update : सध्या उजनी, शेटफळ, टेमघर या धरणक्षेत्रांत आणि घाटमाथ्यावर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत.
Rain
Rain Agrowon
Published on
Updated on

Pune Rain News : गेले आठ ते दहा दिवस धरण क्षेत्रात पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे धरणांतील पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ होती. परंतु गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. सध्या उजनी, शेटफळ, टेमघर या धरणक्षेत्रांत आणि घाटमाथ्यावर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत.

पश्‍चिम पट्ट्यात धरणक्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे भातखाचरे भरत आली आहेत. तर काही ठिकाणी भरून वाहत आहेत. त्यामुळे ओढे, नाले खळाळून वाहू लागले आहेत. येत्या काळात चांगला पाऊस झाल्यास धरणांतील पाणीपातळीत चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील २६ धरणांत पाण्याची आवक सुरू झाल्याने बऱ्यापैकी पाणीसाठा होऊ लागला आहे.

Rain
Sindhudurg Rain Update : जोरदार पावसाने सावंतवाडी, दोडामार्गला झोडपले

मागील दहा ते बारा दिवसांत आलेल्या पावसामुळे धरणांत तब्बल ११.१८ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. तर सोमवारी (ता. ३) धरणक्षेत्रात कमी-अधिक पाऊस झाल्यामुळे मंगळवारी (ता. ४) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या पावसामुळे धरणांत १.५५ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे.

यामध्ये मुठा खोऱ्यातील टेमघर, वरसगाव या धरणांत नव्याने ०.३२ टीएमसी एवढी आवक झाली आहे. नीरा खोऱ्यातील धरणांत नव्याने ०.५५ टीएमसी, तर कुकडी खोऱ्यातील धरणांत नव्याने ०.१२ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. याशिवाय उजनी, मुळशी या धरणांतही पाण्याची आवक झाली आहे.

गेल्या आठवडाभर ठोकरवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा, मुळशी आणि कुंडली अशा घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडला. आता या भागात पावसाचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे.

Rain
Yavatmal Rain Update : यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा प्रवास संथगतीनेच

मंगळवारी (ता. ४) सकाळपर्यंत मुळशीच्या घाटमाथ्यावर ५३ मिलिमीटर, तर लोणवळा ३४ मिलिमीटर पाऊस पडला. तर ठोकरवाडी, शिरोटा, वळवण, कुंडली या घाटमाथ्यांवर तुरळक सरी बरसल्या.

उजनीच्या धरणक्षेत्रातही मागील काही दिवस पावसाने चांगलीच हुलकावणी दिली होती. परंतु सोमवारी (ता.४) दिवसभर झालेल्या पावसामुळे या धरणक्षेत्रात ५४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणांत नव्याने ०.३८ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे.

घोड, येडगाव, डिंभे धरण क्षेत्रात ढगाळ वातावरण

मुठा खोऱ्यातील टेमघर धरणक्षेत्रात ३५ मिलिमीटर पाऊस पडला असून वरसगाव, पानशेत, खडकवासला धरणक्षेत्रात हलक्या सरी पडल्या. नीरा खोऱ्यातील शेटफळ धरणक्षेत्रात सर्वाधिक ५३ मिलिमीटर पाऊस पडला.

तर नीरा देवघर २२ मिलिमीटर, गुंजवणी १२, पवना ११ मिलिमीटर पाऊस पडला असून कासारसाई, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, वडिवळे, नाझरे, वीर, भाटघर धरणक्षेत्रांत हलक्या सरी कोसळल्या.

कुकडी खोऱ्यातील वडज धरणक्षेत्रात १९ मिलिमीटर पाऊस पडला असून पिंपळगाव जोगे, माणिकडोह, चिल्हेवाडी येथे तुरळक सरी, तर घोड, येडगाव, डिंभे धरण क्षेत्रांत ढगाळ वातावरणाची स्थिती कायम होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com