Yavatmal Rain News : यंदा उशिरा मॉन्सूनचे आगमन झाले आहे. जून महिना संपण्याच्या मार्गावर असताना जिल्ह्यात पावसाचा प्रवास संथगतीनेच सुरू आहे. पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग दाटले आहे.
हवामान विभागानुसार, राज्यात मॉन्सूनचे आगमन सात जूनदरम्यान होते. यंदा १९ जूनच्या कालावधीत कोकण विभागात मॉन्सूनचे आगमन झाले.
मात्र, यवतमाळ जिल्ह्यात पाऊस अजूनही धो-धो बरसला नाही. एप्रिल व मे महिन्यात झालेल्या पावसाने नदीनाल्यांना पूर आला. खरीप हंगामात दमदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. त्यामुळे शेतकरी अगदी आनंदीमय होऊन मशागतीच्या कामाला लागले.
जूनच्या पहिल्या आठवड्यात बियाणे, खतांची खरेदी केली. महिना संपायला आला तरी पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. पावसाचा थेंबही कोसळला नाही. त्यावेळी शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली.
सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी पीक कसेबसे वाचविण्यात यश मिळविले. २८ जूनपर्यंत १५३ मिलिमीटर पाऊस कोसळायला पाहिजे होता. प्रत्यक्षात ५७.६ मिमी इतकाच पाऊस झाला. त्याची टक्केवारी ३७.६ आहे.
गेल्या वर्षी ९४.५ मिलिमिटर पाऊस झाला होता. त्याची टक्केवारी ६१.८ इतकी होती. म्हणजेच पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरी पेरते झाले होते. यंदाच्या खरीप हंगामात चित्र वेगळेच आहे. अजूनही पावसाचा प्रवास संथगतीने सुरू आहे. आकाशात केवळ काळे ढग दाटून येत आहे. मात्र, जोरदार पाऊस कोसळला नाही.
सामान्यतः: शेतकऱ्यांनी ८० ते शंभर मिमी पाऊस पडल्याशिवाय पेरणी करून नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. तरीदेखील बहुतांश शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.