Fruit Crop Insurance : आठ फळपिकांसाठी विमा योजना लागू

Crop Insurance Scheme : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०२३-२४ मृग बहरामध्ये डाळिंब, पुरू, चिकू, लिंबू, संत्रा, मोसंबी, सीताफळ व द्राक्षे या फळपिकांना लागू करण्यात आली आहे.
Fruit Crop
Fruit CropAgrowon
Published on
Updated on

Pune News : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०२३-२४ मृग बहरामध्ये डाळिंब, पुरू, चिकू, लिंबू, संत्रा, मोसंबी, सीताफळ व द्राक्षे या फळपिकांना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास संरक्षण देणारी ही योजना असून, अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी आहे. पंतप्रधान पीकविमा योजना कर्जदार तसेच बिगरकर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातीत अधिसूचित पिकासाठी ऐच्छिक आहे.

उत्पादनक्षम फळबागांनाच विमा सरंक्षणाचे कवच लागू राहणार आहे. नुकसानभरपाई महावेध प्रकल्पांतर्गत महसूल मंडळस्तरावरील स्वयंचलित हवामान केंद्रांच्या आकडेवारीनुसार ठरविण्यात येते.

Fruit Crop
Crop Insurance : नुकसान निश्‍चितीसाठी तंत्रज्ञानाचा होणार वापर

डाळिंबासाठी १४ जुलै अंतिम मुदत

खेड, दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापूर, पुरंदर, शिरूर व हवेली या तालुक्यांतील डाळिंब फळपिकासाठी अंतिम मुदत १४ जुलै असून, विमा संरक्षित रक्कम १ लाख ३० हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम ६ हजार ५०० रुपये इतकी आहे.

पेरूसाठी १४ जून अंतिम मुदत

इंदापूर, खेड, पुरंदर, हवेली, भोर, बारामती, दौंड व शिरूर या तालुक्यांतील पेरू फळपिकासाठी अंतिम मुदत १४ जून असून, विमा संरक्षित रक्कम ६० हजार रुपये, तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम ३ हजार रुपये इतकी आहे.

चिकूसाठी ३० जून

आंबेगाव, इंदापूर, दौंड, भोर, जुन्नर, शिरूर व बारामती या तालुक्यांतील चिकू फळपिकासाठी अंतिम मुदत ३० जून असून, विमा संरक्षित रक्कम ६० हजार रुपये, तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम १३ हजार २०० रुपये इतकी आहे.

लिंबू, संत्र्यासाठी १४ जून अंतिम मुदत

इंदापूर, शिरूर, बारामती व दौंड या तालुक्यांतील लिंबू फळपिकासाठी अंतिम मुदत १४ जून असून, विमा संरक्षित रक्कम ७० हजार रुपये, तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम ४ हजार ५५० रुपये इतकी आहे. शिरूर तालुक्यातील संत्रा फळपिकासाठी अंतिम मुदत १४ जून असून, विमा संरक्षित रक्कम ८० हजार रुपये, तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम ६ हजार रुपये इतकी आहे.

Fruit Crop
Crop Insurance : शेतकऱ्यांना विमा नाकारणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा

मोसंबीसाठी ३० जून अंतिम मुदत

इंदापूर व शिरूर या तालुक्यांतील मोसंबी फळपिकासाठी अंतिम मुदत ३० जून असून, विमा संरक्षित रक्कम ८० हजार रुपये, तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम ४ हजार रुपये इतकी आहे.

सीताफळासाठी ३१ जुलै अंतिम मुदत

आंबेगाव, इंदापूर, खेड, जुन्नर, दौंड, पुरंदर, बारामती, भोर व शिरूर तालुक्यांतील सीताफळ फळपिकासाठी अंतिम मुदत ३१ जुलै असून, विमा संरक्षित रक्कम ५५ हजार रुपये, तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम ६ हजार ३२५ रुपये इतकी आहे.

द्राक्षासाठी १४ जून अंतिम मुदत

इंदापूर व बारामती तालुक्यांतील द्राक्ष फळपिकासाठी अंतिम मुदत १४ जून असून, विमा संरक्षित रक्कम ३ लाख २० हजार रुपये, तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम १६ हजार रुपये इतकी आहे.

शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी मृग बहरातील फळपिकांची विमा नोंदणीकरिता भारतीय कृषी विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक १८०० ४१९ ५००४, दूरध्वनी क्रमांक ०२२-६१७१०९१२ व ई-मेल आयडी pikvima@aicofindia.com वर संपर्क साधावा.

अधिसूचित क्षेत्रातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com