Water Resource : जलस्त्रोतांची तपासणी ३१ डिसेंबर पर्यंत होणार

दरवर्षी पावसाळाच्या आधी व पावसाळ्यानंतर जलस्त्रोतांची तपासणी केली जाते.
Water Resources
Water ResourcesAgrowon

सातारा : दरवर्षी पावसाळाच्या आधी व पावसाळ्यानंतर जलस्त्रोतांची (Water Resources) तपासणी केली जाते. त्यानुसार जिल्ह्यातील एक हजार ४७२ ग्रामपंचायतीमधील सात हजार २७७ जल स्रोतांचे मोबाईल ॲपद्वारे रासायनिक तपासणी पाणी व स्वच्छता विभागामार्फत सुरु करण्यात आली आहे. जलस्त्रोतांची तपासणी (Inspection Of Water Resources) ३१ डिसेंबर पर्यंत करण्यात येणार असून, जिल्हा परिषदेने ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे तालुकानिहाय तपासणी सुरू झाली आहे.

Water Resources
Water Conservation : श्रमदानातून उभारले ३ हजार वनराई बंधारे

जिल्हा परिषदेच्या पाणी स्वच्छता मिशन कक्षामार्फत दरवर्षी रासायनिक पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात येते. पाणी नमुने प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामपंचायतीमार्फत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे नमुने गोळा करण्यात येत आहेत.

Water Resources
Irrigation Scheme : मुख्यमंत्री सिंचन योजनेतून मिळणार वैयक्तिक शेततळे

जलसुरक्षकांनी ग्रामपंचायत परिसरातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे नमुने ग्रामसेवक, आरोग्य सेवक व आरोग्य सहायकांच्या सहकार्याने जिओ फेन्सिंग मोबाईल ॲपद्वारे गोळा करण्यात येणार आहेत.

या पाणी नमुन्याची रासायनिक तपासणी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणांच्या उपविभागीय प्रयोगशाळेत करण्यात येत आहे. जलस्त्रोतांच्या सर्वेक्षण आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्त्रोतांचा परिसर योजनेची पाणी शुद्धीकरणाची प्रत्यक्ष पाहणी करून गुणवत्ता निश्चित करणार आहेत.

सातारा तालुक्यातील १७४ ग्रामपंचायतीमधील ८७२ जलस्त्रोत, कोरेगाव तालुका १४१ ग्रामपंचायत ६६६, खटाव तालुका १३२ ग्रामपंचायतीमधील एक हजार ३८०, माण तालुक्यातील ९६ ग्रामपंचायत ७१२, फलटण तालुका १२८ ग्रामपंचायत ८६६, खंडाळा तालुका ६५ ग्रामपंचायत १९६, वाई तालुका ९९ ग्रामपंचायत ४१७, जावली तालुका १२५ ग्रामपंचायत ४७५, महाबळेश्वर तालुका ७९ ग्रामपंचायत २७२, कऱ्हाड तालुका १९४ ग्रामपंचायत ७४५, पाटण तालुका २३९ ग्रामपंचायत ६७६ जलस्त्रोत असे एकूण एक हजार ४७२ ग्रामपंचायतीमधील सात हजार २७७ पाणी नमुन्यांची तपासणी सातारा, खंडाळा, कर्हाड उपविभागीय कार्यालयात होणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com