Zero Tillage : ‘शून्य मशागत’साठी दुर्गम भागातील शेतकरी सरसावले

Agriculture Technique : यंदा पाऊस अधिक झाल्याने फार कमी क्षेत्रावर या तंत्रज्ञानुसार लागवड करता आली, असे समीत हेमणे यांनी सांगितले.
Zero Tillage
Zero TillageAgrowon
Published on
Updated on

Bhandara News : राज्यात पाच हजारांवर शेतकऱ्यांद्वारे अनुकरण होणाऱ्या चंद्रशेखर भडसावळे यांच्या शून्य मशागत तंत्रज्ञानाचे अनुकरणासाठी लाखनी तालुक्‍यातील समीत दयाराम हेमणे व कुशाल बोरीकर यांनी देखील पुढाकार घेतला आहे. यंदा पाऊस अधिक झाल्याने फार कमी क्षेत्रावर या तंत्रज्ञानुसार लागवड करता आली, असे समीत हेमणे यांनी सांगितले.

Zero Tillage
Zero Tillage Technology: शून्य मशागतीचे फायदे काय आहेत ?

पाणी वापर संस्थांच्या पिंपळगाव येथे आयोजित बैठकीत अनिल निवळकर यांनी एसआरटी तंत्राविषयी माहिती दिली. तालुक्‍यातील ५५ शेतकरी या बैठकीला होते. त्यातील ३० शेतकऱ्यांनी एसआरटी तंत्रज्ञानुसार लागवडीचा निर्णय घेतला होता.

परंतु यंदा पाऊस जास्त झाल्यामुळे त्यांना गादी वाफे करणे शक्‍य झाले नाही. समीत हेमणे यांनीदेखील अर्धा एकरावर या तंत्रज्ञानुसार लागवड करण्याचे ठरविले होते. परंतु अधिक पावसामुळे केवळ १५ आर जागेवरच गादी वाफे करून त्यावर लागवड करणे शक्‍य झाले.

Zero Tillage
Zero Tillage : कोरडवाहू शेतीत हवा शून्य मशागत तंत्राचा अवलंब

यामध्ये आडवी, उभी नांगरटी, रोटाव्हेटरच्या सहाय्याने माती भुसभुशीत करून घेतो. जमिनीचा उतार पाहून म्हणजे पाण्याचा निचरा करणे शक्‍य होईल. १०० सेंटीमीटर रुंद आणि अर्धा फूट उंच असा वाफा तयार करण्यात आला.

एसआरटी १०० सेंटीमीटर, प्रत्येकी २५ सेंटीमीटरवर पाच दाते याप्रमाणे साच्यावर २० दाते राहतात. त्याच्या सहाय्याने जमीन ओलसर झाली की, त्या साच्याच्या सहाय्याने अर्धा इंच खड्डा पाडून धान टोकण करण्यात आले. तणनाशकाची फवारणी करण्यात आली.

त्यामुळे १५ ते २० दिवस तणाचा प्रादुर्भाव टाळता येतो. हंगाम अखेरीस पारंपरिक पद्धतीत अर्धा फुटापर्यंत धांडे (धसकट/वेस्ट) ठेवतो यामध्ये चार इंच धांडे ठेवून ग्लायफोसेट मारले जाते. जमिनीखालील भाग कुजणे अपेक्षीत आहे. या माध्यमातून जमिनीचा कर्ब वाढीस लागतो. रब्बी हंगामात गहू, हरभरासोबतच उन्हाळी मूग सुरुवातीला व त्यानंतर भात लागवड केली जाणार आहे.

१५ ते २० वर्षे नांगरटी करण्याची गरज नाही. सोबतच बेडमुळे चिखलणीही करावी लागणार नाही. खताचे प्रमाणही कमी होणार आहे. एकरी ७० किलो युरीया बिक्रेट दिली तरी भागणार आहे. पर्यावरणपूरक शेती पद्धतीचा फायदा होणार आहे.
- समीत दयाराम हेमणे, शेतकरी, जेवनाळा, लाखनी, भंडारा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com