Sarki Oil : सरकी तेलाचे उत्पादन आणि वापराबाबत उदासीनता

Cotton Seed Oil : अमेरिकेसह जगातील अनेक देशांमध्ये स्वयंपाकघरात सरकीच्या तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. सरकीचे तेल हे प्रामुख्याने तळण्यासाठी वापरले जाते.
Sarki Oil
Sarki OilAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : अमेरिकेसह जगातील अनेक देशांमध्ये स्वयंपाकघरात सरकीच्या तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. सरकीचे तेल हे प्रामुख्याने तळण्यासाठी वापरले जाते. कारण त्यात तळलेले अन्नपदार्थ अधिक काळासाठी ताजे राहून त्याचा स्वाद, चव आणि खमंगपणा अबाधित ठेवतात.

मात्र भारतात सरकीचे उत्पादन इतर तेलबियांपेक्षा अधिक असूनही सरकीच्या तेलाचे उत्पादन आणि वापराबाबत उदासीनता दिसून येत असल्याचे मत मुंबईस्थित ऑल इंडिया कॉटन सीड क्रशर्स असोसिएशनचे अध्यक्ष संदीप बाजोरिया यांनी व्यक्त केले.

एसईए आणि दि ऑल इंडिया कॉटन सीड क्रशर्स असोसिएशन (एआयसीओएससीए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौथ्या एसईए-एआयसीओएससीए कॉटन सीड ऑइल कॉन्क्लेव्ह-२०२३ मध्ये ते शनिवारी (ता. ८) बोलत होते.

श्री. बाजोरिया म्हणाले, की भारतात भुईमूग, मोहरी, सोयाबीन, तीळ, सूर्यफूल, करडईसारख्या तेलबियांची मोठ्या प्रमाणात लागवड होते. याच्या सोबतीला आता कापूस, नारळ आणि ऑइल पाम यांसारखी खाद्यतेलाची पिके घेतली जात आहेत.

अलीकडेच, भारताने भाताच्या भुश्‍शापासून (राइस ब्रॅन ऑइल) तेलाचे उत्पादन सुरू केले आहे. विशेष म्हणजे भारतात याचे उत्पादन १० लाख टन असून, ते चीन आणि जपानच्या पुढे आहे.

Sarki Oil
Sarki Oil : बहुगुणी सरकी तेल माहितीअभावी दुर्लक्षित

अलीकडेच भारत जगातील पहिल्या क्रमांकाचा कापूस उत्पादक झाल्यानंतर देशात उत्पादित होणाऱ्या सर्व प्रमुख तेलबियांमध्ये कापूस बी अथवा सरकीचे उत्पादन सर्वाधिक होत आहे. त्याने सोयाबीन, मोहरी आणि भुईमुगालाही मागे टाकले आहे. सरकी ही बहुगुणी आहे. तिचा वापर कापूस बियाणे म्हणून केला जातो. कापसापासून वस्त्रनिर्मिती होतेच. परंतु त्याच्या बीवर म्हणजे सरकीवर प्रक्रिया करून यापासून मोठ्या प्रमाणात पेंड तयार होते. त्याचा किफायतशीर पशुखाद्य म्हणून वापर होतो.

दुग्ध व्यवसायाबरोबरच कुक्कुटपालन आणि मत्स्यबीज व्यवसायात देखील यापासून पशुखाद्य म्हणून वापर होऊ शकतो. याच प्रक्रियेतून कॉटन लिंटर्स, हल्ल्स हे किमती उपपदार्थ देखील तयार होत असल्याने त्यातून मूल्यवर्धन साधता येते. सर्वांत महत्त्वाचे या प्रक्रियेतून तयार होणारे खाद्यतेल आयातीवर खर्च होणारे आणि देशासाठी महत्त्वाचे परकीय चलन वाचवते.

विविध गुणांनी ठासून भरलेली आणि तुलनेने स्वस्त असलेली सरकी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरू शकते. परंतु त्यासाठी सरकी प्रक्रिया उद्योगाचे आधुनिकीकरण अत्यंत गरजेचे आहे. भारतात कापूस लागवड केवळ वस्त्रोद्योग विकासासाठी केली जाते. सरकीचा वापर प्रामुख्याने पेंड उत्पादनासाठी. मात्र खाद्यतेलाकडे दुर्लक्ष केले जाते.

Sarki Oil
Sarki Parishad : छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार सरकी परिषद

गुजरात, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही भाग येथेच कपाशीचे तेल खाण्यासाठी वापरले जाते. याउलट अमेरिकेत १८०० पासून कापूस बियाण्यांच्या तेलाला ‘मेरिकेचे मूळ वनस्पती तेल’ हा दर्जा मिळाला आहे.

तेथे सॅलड ड्रेसिंगसाठी देखील या तेलाचा चांगला वापर केला जातो. ट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी (सीआयआरसीओटी), आयसीएआर, मुंबईच्या शास्त्रज्ञांच्या मते तीळ, करडई आणि शेंगदाणा, मोहरी, ऑलिव्ह आणि बदाम यांच्या तुलनेत कापूस बियांचे तेल फॅटी ॲसिडचा उत्कृष्ट स्रोत आहे.

या तेलामध्ये कॅरोटीन आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सच्या स्वरूपात उच्च प्रमाणात आणि प्रभावी प्रो-व्हिटॅमिन ए असतात. कापूस बियांच्या तेलाला ‘ऑईल’ म्हटले जाते. पारंपरिक तेलामध्ये सुमारे ३० टक्के, तर कापूस बियाण्यांच्या तेलामध्ये ५० टक्के आवश्यक पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असतात.

हे कोरोनरी धमन्या कडक होण्यापासून प्रतिबंधित करते. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या ‘ओके’ खाद्यपदार्थांच्या यादीतील काही तेलांपैकी हे एक आहे. कोलेस्ट्रोलमुक्त असलेल्या या तेलात चरबीचे प्रमाण कमी असल्याचे बाजोरिया यांनी या वेळी नमूद केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com