Sugar Export : व्यापार करारामुळे अमेरिका घेणार भारताची साखर

साऱ्या जगाला साखरेचा पुरवठा करणारा ब्राझीलसारखा देश शेजारी असतानाही अमेरिकेला यंदा भारतातून साठेआठ हजार टन कच्ची साखर निर्यात करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
Sugar Export
Sugar ExportAgrowon

पुणे ः साऱ्या जगाला साखरेचा पुरवठा (Sugar Supply) करणारा ब्राझीलसारखा देश शेजारी असतानाही अमेरिकेला यंदा भारतातून साठेआठ हजार टन कच्ची साखर निर्यात (Sugar Export) करण्याच्या हालचाली सुरू आहेत. निर्यात कामकाजाची जबाबदारी केंद्र शासनाने अपेडाकडे सोपविली आहे.

Sugar Export
Sugar Export : साखर निर्यातीला हिरवा कंदील ?

ब्राझीलमधील चालू विपणन वर्षात ६२१ दशलक्ष टन उसाचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीपेक्षा किमान आठ टक्क्यांनी उत्पादन वाढणार आहे. ब्राझीलची साखर निर्यात यंदा २८.२ दशलक्ष टनाच्या आसपास राहील. ही निर्यात गेल्या वर्षीपेक्षा २.२५ दशलक्ष टनांनी जादा असेल. ब्राझीलमध्ये यंदा ४५ टक्के साखरेचे, तर ५५ टक्के उत्पादन इथेनॉलचे करण्याचे धोरण आहे.

‘‘अमेरिकेला भारतीय साखरेची अजिबात गरज नाही. मात्र दोन देशांमध्ये नियमित होत असलेल्या मैत्रीपूर्ण कराराचा एक भाग म्हणून ही साडेआठ हजार टन साखर निर्यातीचा कोटा केंद्र सरकारने जाहीर केलेला दिसतो आहे. ही साखर टीआरपी (टारिफ रेट कोटा) प्रणालीतून निर्यात केली जाईल,’’ अशी माहिती साखर उद्योगातील सूत्रांनी दिली. अमेरिकेप्रमाणेच संयुक्त अमिरातीला ५८४१ टन साखर निर्यात करण्याचा क्वोटा जाहीर करण्यात आलेला आहे.

Sugar Export
Sugar Export : साखर दरातील तेजीचा निर्यातीवर काय परिणाम होणार?

साखर निर्यातदार अभिजित घोरपडे यांच्या म्हणण्यानुसार, ‘‘अमेरिका आपल्या मुख्य निर्यातदार देशांच्या यादीत नाही. शेजारी ब्राझील असल्यामुळे भारतीय साखरेची आयात या देशाला परवडत नाही. बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ हे आशियायी देश आपले आयातदार असून, आखाती देशदेखील मोठ्या प्रमाणात भारतीय साखर विकत घेतात.

अलीकडेच चीनदेखील भारतीय साखरेची आयात करू लागला आहे. तथापि, अमेरिकेकडून साखरेची आयात वाढण्याची कोणतीही शक्यता नाही. केवळ व्यापार धोरणांमधील सौहार्द टिकवून ठेवण्यासाठी थोडीफार साखर अमेरिकेला पाठवली जाते.’’ टीआरक्यू कोट्यातून अमेरिका व संयुक्त अमिरातीसाठी साखर निर्यात करणाऱ्या निर्यातदारांना महिनाअखेरपर्यंत अपेडाकडे अर्ज करावे लागणार आहेत.

एका साखर कारखान्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांनी सांगितले, की भारताप्रमाणेच अमेरिकेनेही जागतिक व्यापार करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे कोणत्याही मालाच्या आयातीवर बंधने टाकता येत नाही. भारताप्रमाणेच अमेरिकेत साखर आयात किंवा निर्यातीला बंदी नाही. मात्र कोटा जाहीर करून किंवा अबकारी कर वाढवून निर्यात नियंत्रित केली जाते. भारताने मात्र कोटा पद्धतीच्या माध्यमातून निर्यात नियंत्रित केलेली आहे. अर्थात, त्याचा फायदा ब्राझीलला होण्याची शक्यता आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com