Global Warming : भारतातील दुध उत्पादकांचे १५ हजार कोटींचे नुकसान

उष्णतेच्या लाटांमुळे दुधाच्या उत्पादनावरही परिणाम होत असल्याचं एका अभ्यासात म्हटलंय.
Milk Production
Milk ProductionAgrowon

भारतात सातत्याने उष्णतेच्या लाटा येत आहेत, त्याचबरोबर हवामानात तीव्र बदल जाणवत आहेत. हे सगळं ग्लोबल वॉर्मिंगमुळे (Global Worming) सुरू आहे. त्यामुळे अन्न उत्पादनाची स्थिती चिंताजनक होऊ शकते. या उष्णतेच्या लाटांमुळे दुधाच्या उत्पादनावरही (Milk Produtcion) परिणाम होत असल्याचं एका अभ्यासात म्हटलंय.

भारतातील शेतीमाल, दुध उत्पादन वाढवण्यासाठी नेदरलँडचे मार्गदर्शन

अभ्यासात असं म्हटलंय की, तापमान आर्द्रता निर्देशांकात एका एककाने वाढ होते आहे हे सुद्धा थर्मल स्ट्रेसचं सूचक आहे. यामुळे  उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील दुधाळ जनावरांची दूध उत्पादकता ०.४२ ते ०.६७ टक्यांनी घटल्याचे या अभ्यासात नमूद केलं आहे. 

"पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये दुधाळ जनावरांची संख्या जास्त आहे. पण उष्णतेमुळे दूध उत्पादनाचं नुकसान सुमारे ३,३९,००० टन असण्याचा अंदाज या अभ्यासात व्यक्त करण्यात आलाय. दुधाचा किरकोळ विक्रीचा दर प्रति लिटर ४५ रूपये धरला तर हा तोटा सुमारे १५ हजार कोटी रूपयांच्या घरात जातो, असे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. 

Milk Production
कोल्हापुरात अतिवृष्टीमुळे सुमारे हजार कोटींचे नुकसान

आर्थिक नुकसानीच्या बाबतीत बघायचं झाल्यास पंजाब आणि हरियाणापेक्षा उत्तरप्रदेशचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधन अभ्यासानुसार, उष्णतेच्या लाटा म्हणजे थोडक्यात तीव्र उन्हाच्या झळा बसतात. त्यामुळे जनावरं आजारी पडतात. त्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना तापमान नियंत्रणासाठी संसाधनं वाढवावी लागतात, जसं की कुलिंग इक्विपमेंट.  यामुळे दूध उत्पादनाचा खर्च १२ टक्क्यापर्यंत वाढतो. यात पंखे आणि स्प्रिंकलर सारखे कुलिंग पर्याय असतात. पण त्यामुळे वीज आणि पाण्याचा वापर वाढतो. लहान दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे पर्याय आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसतात.

भारताचं २०१४ मधील दूध उत्पादन १४६ दशलक्ष टन इतकं होतं. यात आता ४४ टक्के  वाढ झाली असून उत्पादन आता २१० दशलक्ष टन इतकं झालंय. दूध उत्पादनात वार्षिक ६ टक्क्यांची वाढ होते आहे. हे उत्पादन जागतिक सरासरीच्या २ टक्के जास्त आहे.

पण उष्णतेच्या तीव्र झळांमुळे भारताच्या कृषी क्षेत्रातील जोखीम वाढते. यात दुग्धव्यवसायाचा देखील समावेश होतो.  देशाच्या जीडीपीमध्ये दुग्धव्यवसायाचा वाटा जवळपास १७ टक्के इतका आहे. दुग्ध व्यवसायामुळे जवळपास निम्म्या लोकसंख्येला रोजगार मिळतो.

अवेळी पावसाने देखील शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना दिसतंय.  हवामानातील हे बदल वारंवार आणि कायम होताना दिसतायत, याविषयी अंदाज बांधणं देखील कठीण झालंय.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com