कोल्हापुरात अतिवृष्टीमुळे सुमारे हजार कोटींचे नुकसान

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सुमारे १ हजार ५० कोटींहून अधिक रकमेचे नुकसान झाले असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.
कोल्हापुरात अतिवृष्टीमुळे सुमारे हजार कोटींचे नुकसान Due to heavy rains in Kolhapur Loss of around Rs
कोल्हापुरात अतिवृष्टीमुळे सुमारे हजार कोटींचे नुकसान Due to heavy rains in Kolhapur Loss of around Rs
Published on
Updated on

कोल्हापूर : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सुमारे १ हजार ५० कोटींहून अधिक रकमेचे नुकसान झाले असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. अतिवृष्टीमुळे विविध मार्गाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून, आगामी काही दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.   सध्या जिल्ह्यात पूरबाधित क्षेत्रात पंचनामे सुरू आहेत. जिल्ह्यातील पूरबाधितांना सानुग्रह अनुदानासाठी आगाऊ मदत म्हणून शासनाकडून १७ कोटी ४२ लाख ५ हजार इतका निधी प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात ७१ हजार २८९ इतकी पूरबाधित कुटुंब संख्या असून, त्यापैकी ६१ हजार ८६४ इतक्या जणांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. अतिवृष्टीमुळे ५ हजार ७८९ घरांची अंशतः तर १ हजार १०७ घरांची पूर्ण पडझड झाली आहे. त्यापैकी अनुक्रमे ५ हजार १०३ व ८०९ इतके पंचनामे पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील २ हजार ४६६ गोठा पडझडी पैकी केवळ ६४६ पंचनामे शिल्लक राहिले आहेत, तर १२ हजार १५७ दुकानधारकांपैकी सुमारे ९ हजार ६७५ जणांचे पंचनामे पूर्ण आहेत.  अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका कृषी क्षेत्राला बसला असून, पुरामुळे ५८ हजार ९९७ हेक्टर इतके क्षेत्र बाधित झाले. त्यापैकी आजअखेर २४ हजार ६७० हेक्टर इतक्या क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ७ व्यक्ती मृत झाल्या होत्या. शासकीय निकषानुसार ६ मृत व्यक्ती आर्थिक मदतीसाठी पात्र असून, त्यांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख रुपये सानुग्रह अनुदान वितरित करण्यात आले आहे. एका मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेअंतर्गत मदत देण्यासंदर्भातील प्रस्ताव कृषी विभागाकडे सादर करण्यात आला आहे.   दीडशे जनावरांचा मृत्यू या आपत्तीमध्ये १६१ जनावरे मृत झाली असून, १३ कुटुंबातील सुमारे १५ हजार १७८ इतक्या पोल्ट्री पक्ष्यांचा पंचनामा पूर्ण झाला आहे. हस्तकला, हातमाग, क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या १ हजार १६९ कारागीरांपैकी ९४१ जणांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करावेत, अशा सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या असल्याचेही रेखावार यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com