
Maharashtra Monsoon Assembly Session 2023 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानंतर्गत बचत गटाद्वारे महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या उमेद सीआरपी यांच्या मानधनात वाढ करण्यात आले आहे. पूर्वी ते ३ हजार होते. त्यामध्ये ३ हजारांची वाढ करण्यात आले असून आता ते ६ हजार रुपये मानधन होणार आहे. त्याचबरोबर कृषी सेवकाचं मानधन वाढवून १६ हजार रुपये करण्यात आले.
राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या ९ वा दिवस आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारच्या विविध कामांची माहिती दिली. यावेळी कृषीसेवक आणि उमेद सीआरपीच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
कृषी विभागामध्ये गावपातळीवर कृषी सहाय्यकांचे मदतनीस म्हणून कृषी सेवक कार्यरत आहे. ते शासन व शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे तसेच मार्गदर्शन करण्याचे काम करतात. त्यांना अवघ्या ६००० रुपये या तुटुंपुंज्या मानधनावर कार्यरत आहे. त्यांच्या मानधनात १० हजार रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता कृषी सेवकांना १६ हजार रुपये मानधन मिळणार आहे.
गाव पातळीवर बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करणाऱ्या उमेद अभियानंतर्गत सीआरपी (समुदाय संसाधन व्यक्ती) यांना अवघ्या तीन हजार रुपये मानधनात काम करावे लागत आहे. त्यांच्या मानधन वाढीसाठी उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेने हजारो महिलांनी मंत्रालयावर मोर्चा काढला होता. त्यावर शासनाने त्यांच्या मानधनात ३ हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उमेद सीआरपींना ६ हजार रुपये मानधन मिळणार आहे. तसेच उमेदंतर्गत काम करणाऱ्या बचत गटांच्या खेळते भांडवलामध्ये १५ हजारांची वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक बचत गटाला ३० हजार रुपये दिले जाणार आहे. तसेच शालेय गणवेश पुरवण्याचे काम बचत गटाकडून केले जाणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.