Animal Feed : बार्शीत दूध संघाच्या पशुखाद्य कारखान्याचे बुधवारी उद्‍घाटन

जिल्हा दूध संघाने जिल्ह्यातील इतर स्पर्धक दूध संघ व खासगी दूध डेअरीच्या तुलनेने अधिकचा दर दूध उत्पादकांना दिला आहे.
Milk Union
Milk UnionAgrowon

सोलापूर ः जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या बार्शी (District Cooperative Milk Producers Union Barshi) येथील पशुखाद्य कारखान्याचे बुधवारी (ता. २५) दुपारी चार वाजता उद्‍घाटन होणार आहे. प्रतिदिन शंभर टन पशुखाद्याची निर्मिती या कारखान्यातून होणार आहे, अशी माहिती संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे (Chairman Ranjit Singh Shinde) यांनी दिली.

जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बुधवारी (ता. २५) आमदार बबनराव शिंदे, माजी मंत्री दिलीप सोपल, माजी आमदार राजन पाटील, आमदार संजय शिंदे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार प्रशांत परिचारक, ‘शेकाप’चे नेते चंद्रकांत देशमुख, बबनराव आवताडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हे उद्‍घाटन होईल.

‘‘गेल्या दोन वर्षांपासून हा कारखाना बंद होता. कारखान्यासाठी आवश्यक दुरुस्त्या करून हा कारखाना आता पूर्ण क्षमतेने चालवला जाणार आहे.

जिल्हा दूध संघाने जिल्ह्यातील इतर स्पर्धक दूध संघ व खासगी दूध डेअरीच्या तुलनेने अधिकचा दर दूध उत्पादकांना दिला आहे. दूध संघाचे पेमेंटही वेळेवर होत असल्याने दूध संघाच्या दूध संकलनात वाढ होऊ लागली आहे,’’ असेही शिंदे म्हणाले.

Milk Union
Clean Milk Production : स्वच्छ दूध निर्मितीवर लक्ष द्या

दूध खरेदीदरात एक रुपयाची वाढ

‘जिल्ह्यातील दूध उत्पादकांसाठी जिल्हा दूध संघाने गाईच्या दूध खरेदीदरात एक रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

एक रुपयांची ही दरवाढ येत्या शनिवारपासून (ता.२१) लागू होणार आहे. या दरवाढीमुळे दूध संघाचा खरेदी दर ३७ रुपये प्रतिलिटरवर पोहोचणार आहे,’’ असेही शिंदे म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com