Team Agrowon
यंत्रामध्ये कोणताही दोष नाही, याची खात्री करावी.
गोठ्यातील जमीन स्वच्छ व सपाट असावी. गोठ्यात जनावरांची गर्दी नसावी. गोठा सदैव स्वच्छ असावा. हवा खेळती असावी.
दूध काढण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यावेत. निर्जंतुक करून नंतरच दूध काढावे.
दूध काढण्यापूर्वी यंत्राचे सर्व भाग निर्जंतुक करून घ्यावेत.
दूध काढतेवेळी दूध पात्राच्या दिशेने खोकू किंवा शिंकू नये.
दूध काढताना चारही सडांमधून सुरवातीच्या धारा जमिनीवर सोडाव्यात.