Police Patil : विक्रगडमध्ये ६० गावांचा ३३ पोलिस पाटलांवर भार

शासनाने प्रत्येक गावात महसूल गावानुसार पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावासाठी स्वतंत्र पोलिस पाटलांचे पद नियुक्त केले आहे
Police Patil
Police PatilAgrowon
Published on
Updated on

विक्रमगड : शासनाने प्रत्येक गावात महसूल गावानुसार पोलिस (Police) ठाण्यांतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावासाठी स्वतंत्र पोलिस पाटलांचे (Police Patil) पद नियुक्त केले आहे; मात्र विक्रमगड तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून केवळ ३३ पोलिस पाटील ६० गावांचा संपूर्ण भार सांभाळत आहे. त्यामुळे एका पोलिस पाटलाला दोन गावांची जबाबदारी येऊन ठेपल्याने तारेवरची करसत करावी लागत आहे.

Police Patil
Farmer CIBIL : शेती कर्जासाठी सीबीलची अट नकोच

सध्या पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी प्रत्येक पोलिस पाटलास विशिष्ट गणवेश दिला आहे. त्याच गणवेशामध्ये त्यांनी काम करावे, असे सांगण्यात आले आहे. तालुक्यात २७ पोलिस पाटलांची पदे रिक्त असल्याने प्रत्येकाला दोन गावांची जबाबदारी स्वीकारावी लागत आहे. त्यामुळे अतिरिक्त कामाचा ताण वाढत आहे.

गाव खेड्यामध्ये होत असलेले वाद, भांडणे, अडचणी सोडवण्यासाठी, गावामध्ये सलोखा राखणे, पोलिसांना गावाची माहिती पुरविणे, विविध दाखले देणे, सरकारी कामे करून घेणे, त्याबाब आलेल्या अधिका-यांना माहिती देणे. या कामाकरिता दररोज पोलिस पाटलांना तत्पर राहावे लागते. त्यातच शासनाने दिलेले मानधन खूप कमी असल्याने त्यामध्ये वाढ करावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.

Police Patil
Sugar Export : मे नंतर आणखी साखर निर्यातीस परवानगी शक्य

शासनाचे पोलिस पाटलांकडे दुर्लक्ष असून त्यांना गेल्या १२ वर्षांपासून प्रवास भत्ता मिळलेला नाही. त्यांच्या मानधनात वाढ झालेली नाही व रिक्त पदे भरण्यात आलेली नाही. याबाबत संघटनेने शासनाकडे पत्रव्यवहार केलेला असूनदेखील त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे समोर आले आहे. शासनाने पोलिस पाटलांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन पाठपुरावा करावा, अशी मागणी पोलिस पाटील संघटनेने केली आहे.

गेल्या १२ वर्षांपासून पोलिस पाटलांना प्रवास भत्ता मिळालेला नाही. तसेच तालुक्यात २७ पोलिस पाटलांची पदे रिक्त असल्याने एकेकाला दोन दोन महसुली गांवाची अतिरिक्त जबाबदारी स्वीकारावी लागत आहे. शिवाय मानधनातदेखील वाढ झालेली नाही, याकडे शासनाने लक्ष द्यावे.

- राजेंद्र पाटील, कार्यध्यक्ष,

पोलिस पाटील संघटना, पालघर

Police Patil
Crop Damage Survey : ‘पंचनामे राहिलेल्या शेतकऱ्यांनो संपर्क साधा’

वर्षा पर्यटनांसाठी गर्दी

पावसाळ्यात फेसाळणाऱ्या धबधब्यांवर भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक वांद्री धरण परिसरातील बहिरीफोंडा जायशेत सारख्या दुर्गम भागाकडे येत असतात. जायशेत- बहिरीफोंडा ग्रामपंचायत हद्दीतील ठाकूर पाड्याच्या ओहोळ, धबधबा, वांद्री धरणाचा कालवा आणि जायशेत रस्त्यावरील हिरवाईकडे पर्यटक आकर्षित होत असल्याने पावसाळ्यात आठवडयाच्या अखेरचे दोन दिवस वांद्री धरण आणि ठाकुरपाडा भागात पर्यटकांची गर्दी असते.

शासकीय परिपत्रकानुसार दिवसाकाठी पंचवीस हजार रुपये रक्कम आकारून चित्रीकरणाला परवानगी दिली जाते. वर्षभरात सुमारे पंधरा ते सोळा परवानग्या दिल्या जातात. यातून चांगला महसूल मिळत आहे.

निलकमल गवई, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग

गांजे ढेकाळे ग्रामपंचायत हद्दीतील वांद्री धरण परिसरात चित्रीकरणासाठी अनेक निर्माते येत आहेत. वर्षाला दहा ते पंधरा चित्रीकरणाच्या युनिटला ग्रामपंचायतीमार्फत परवानगी दिली जात आहे.

सतीश भागवत, ग्रामसेवक, गांजे-ढेकाळे ग्रामपंचायत

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com