Cotton Rate : सेलू बाजार समितीत कापूस सरासरी ७७२५ रुपये क्विंटल

Cotton Market : सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलावाद्वारे होणारी कापूस खरेदी अंतिम टप्प्यात आहे. गेल्या पंधरावाड्यापासून कापूस दरात सुधारणा झाली आहे.
Cotton Rate
Cotton RateAgrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा
Selu Bazar Committee : परभणी ः सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलावाद्वारे होणारी कापूस खरेदी अंतिम टप्प्यात आहे. गेल्या पंधरावाड्यापासून कापूस दरात सुधारणा झाली आहे. सेलू बाजार समितीत बुधवारी (ता. ९) कापसाला प्रतिक्वंटल किमान ७७६५ ते कमाल ७६४० रुपये तर सरासरी ७७२५ रुपये दर मिळाले. शनिवारपर्यंत (ता. १२) कापूस खरेदी सुरू राहणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे सचिव राजीव वाघ यांनी दिली.

सेलू बाजार समितीत मंगळवारी (ता. ८) कापसाची १०९१ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७६२५ ते कमाल ७७२० रुपये तर सरासरी ७६६५ रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. ७) कापसाची १३०१ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६४५० ते कमाल ७६८० रुपये तर सरासरी ७६०० रुपयेदर मिळाले. शनिवारी (ता. ५) १६८९ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विटंल किमान ६२५० ते कमाल ७६३५ रुपये तर सरासरी ७५५० रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. ४) १२७५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६४०० ते कमाल ७५७५ रुपये तर सरासरी ७५३० रुपये दर मिळाले.

Cotton Rate
Cotton Market : सेलू बाजार समितीत कापूस प्रतिक्विंटल ६००० ते ७२८० रुपये

गतवर्षीप्रमाणे यंदाही किमान १० हजार रुपये दर मिळतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवून ठेवला होता. परंतु जानेवारीपासून सुरू झालेली दरातील घसरण कायम राहिली आहे. किमान दर साडेपाच हजार रुपयांवर तर कमाल दर सात हजार रुपयांपेक्षा कमी झाले होते. त्यामुळे कापूस उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. जुलैच्या अखेरच्या आठवड्यापासून कापसाच्या दरात सुधारणा होत आहे. परंतु आता बहुतांश शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक राहिलेला नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com