Agriculture Business : कृषिपूरक, उद्योग क्षेत्रात युवकांना मोठी संधी

जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांचे प्रतिपादन
Agriculture Business
Agriculture BusinessAgrowon

नांदेड : जिल्ह्यातील सद्यःस्थितीचा विचार करता कृषिपूरक उद्योगांसह (Agriculture Business) इतर सेवा क्षेत्रांमध्ये तरुणांसाठी मोठी संधी दडलेली आहे. युवकांनी पुढे येऊन या क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी (Khushal Singh Pardeshi) यांनी केले.

Agriculture Business
Tur Crop Management : तुर पिकाच्या चांगल्या वाढीसाठी कोणते उपाय कराल?| Agrowon | ॲग्रोवन

जिल्हा उद्योग केंद्र येथे उद्योजकांसाठी निर्यात गुंतवणूक वृद्धी कार्यक्रम, निर्यात प्रचलन तसेच एक जिल्हा एक उत्पादन या विषयावर दोनदिवसीय आयोजित कार्यशाळेच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी उपविभागीय अधिकारी विकास माने,

Agriculture Business
Crop Damage : पातूर, बार्शी टाकळीतील पीक नुकसानीसाठी मिळाले १० कोटी १५ हजार ३५१

अधिक्षीय उद्योग अधिकारी नितीन कोळेकर, मैत्री कक्षाचे वि. के. बुआ, निर्यात सल्लागार सुरेश पारिख, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी धनंजय इंगळे, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी कर्मचारी व जिल्हातील उद्योजकांची उपस्थिती होती.

जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या उद्योगांना

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सामूहिक प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केल्या. आपल्या जिल्ह्यातील नवीन पिढी जास्तीत जास्त प्रमाणात उद्योग व्यवसायाकडे वळली पाहिजे. जिल्हा उद्योग केंद्र युवा पिढीच्या मार्गदर्शनासाठी तत्पर असून,

विविध शासकीय योजनाही उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. या संदर्भात समुपदेशनाचा मोठी गरज असून, आम्ही त्यावर विचार करीत आहोत. उद्योग उभारणीसाठी आवश्यक सर्व बाबी व तक्रार निवारण यासाठी एकल खिडकी योजना जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात येईल, असेही परदेशी यांनी या वेळी स्पष्ट केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com