Crop Damage : हिरडा फळाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा

Hirda Fruit Compensation : हिरडा फळाच्या व इतर नुकसानीचे पंचनामे त्वरित सुरू करा, अशी मागणी आंबेगाव तालुका किसान सभेच्या वतीने उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर यांच्याकडे केली आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Pune Crop Damage Update : हिरडा फळाच्या व इतर नुकसानीचे पंचनामे (Crop Damage Survey) त्वरित सुरू करा, अशी मागणी आंबेगाव तालुका किसान सभेच्या (Kisan Sabha) वतीने उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर यांच्याकडे केली आहे.

गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यासह आंबेगाव तालुक्याच्या पश्‍चिम आदिवासी भागात गारपिटीसह मुसळधार पाऊस होत असल्याने हिरडा फळ व झाडाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Crop Damage
Crop Damage Survey : अवकाळी पावसाने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या

आंबेगाव तालुक्यातील, आदिवासी भागातील लोकांचे, उपजीविकेचे प्रमुख साधन असलेल्या हिरडा फळांचे व त्याच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे आदिवासी नागरिकांची उपजीविका धोक्यात आली आहे.

Crop Damage
Hailstorm Crop Damage : गारपिटीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

हिरड्याबरोबरच इतरही पिकांचे वा साधन सामग्रीचे जे काही नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश तालुक्यातील प्रशासन यंत्रणेला देण्यात यावे.

आदिवासी भागातील शेतकऱ्यांना त्वरित नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी किसान सभा, आंबेगाव तालुका समितीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.

किसान सभा आंबेगाव तालुका समितीचे अध्यक्ष नंदा मोरमारे, कार्याध्यक्ष बाळू काठे, सचिव रामदास लोहकरे व तालुका समिती पदाधिकारी पुंडलिक असवले, सुभाष भोकटे, दत्ता गिरंगे, देविका भोकटे, कमल बांबळे, अशोक जोशी, दीपक रड्डे यांनी ही मागणी केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com