Crop Damage Survey : अवकाळी पावसाने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या

२०२२-२३ चा आंबा, काजू हंगाम निराशाजनक राहिला आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच आंबा, काजू हंगामावर बदलत्या वातावरणाचा परिणाम झाला.
Crop Damage
Crop DamageAgrowon

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सध्या पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) झालेल्या आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे (Crop Damage Survey) तातडीने करून शेतकऱ्यांना भरपाई देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी आंबा, काजू बागायतदार संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

२०२२-२३ चा आंबा, काजू हंगाम निराशाजनक राहिला आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच आंबा, काजू हंगामावर बदलत्या वातावरणाचा परिणाम झाला.जिल्ह्यात सरासरीच्या २० ते २५ टक्के उत्पादन कमी राहीले आहे.

यावर्षी तिसऱ्या टप्प्यातील आंबा उत्पादन आलेले नसल्यामुळे एप्रिल अखेरपासून बाजारपेठेत आंबा उपलब्ध होईल की नाही अशी स्थिती आहे. विविध नैसर्गिक आपत्तीमुळे आंबा, काजूचे यापूर्वीच नुकसान झाले आहे

Crop Damage
Crop Damage In Nashik : इगतपुरी, सिन्नर, निफाडमध्ये शेतीची वाताहत

त्यातच आता अवकाळी पाऊस पडत आहे. सतत ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू पिकांवर कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. आंब्यावर काळे डाग पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Crop Damage
Nagar Crop Damage : नुकसान पाहणीसाठी विखे-थोरातांची चढाओढ

त्यामुळे आंबा, काजू नुकसानीचे शासनाने पंचनामे तातडीने करावेत आणि भरपाई देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आंबा, काजू बागायतदार संघाचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

तशा आशयाचे निवेदन त्यांनी तहसीलदारांमार्फत पाठविले आहे. या वेळी प्रकाश बोवलेकर, शामसुंदर राय, किशोर नरसुले, वीरेंद्र भांडारकर, सदानंद पेडणेकर आदी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com