

Pune Weather Update : मागच्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसाने बळीराजा पेरणीसाठी लगबग करत असल्याचे दिसून येत आहे. याचबरोबर पूरंदर तालुक्यात पेरणी योग्य पाऊस झाल्याने भात पेरणीला जोर आला आहे. दरम्यान मान्सूनच्या पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने दिला आहे.
पुढच्या ४८ तासांत पुणे जिल्ह्यात पावसाचा आणखी जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (ता.०३) शहरात दिवसभर आकाश ढगाळ आणि बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असे सांगण्यात आले. याच काळात घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मागच्या दोन दिवसांत पावसाचा जोर कमी झाला होता परंतु आजपासून पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काल दिवसभरात पुणे शहरात कुठे पाऊस तर कुठे उन्हाचा खेळ सुरू होता. दिवसभरात शिवाजीनगर येथे ४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर सर्वाधिक पाऊस चिंचवड येथे ११.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
दरम्यान पूढच्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. याचबरोबर पुण्यातील घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरू असल्याने धरण साठ्यात मोठी वाढ होताना दिसत आहे.
याचबरोबर राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर रायगड, पुणे यलो अलर्ट देण्यात आला आहे.
याचबरोबर बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ या भागात विजांसह पावसाची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आहे.
वायव्य उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेरपासून, ग्वालियर, अंबिकापूर, बालासोर, ते बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे.
दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून केरळपर्यंत किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे, तर मध्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ४.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.