Bharat Jodo Yatra : पंतप्रधान, मुख्यमंत्री शेतकऱ्यांपर्यंत गेले, तर आत्महत्या थांबतील

देशाच्या पंतप्रधानांनी, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले, ते त्यांच्यापर्यंत गेले, तर या महाराष्ट्रात आत्महत्या होणार नाहीत.
Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra Agrowon
Published on
Updated on

शेगाव, जि. बुलडाणा : देशाच्या पंतप्रधानांनी, (Prime Minister) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister) शेतकऱ्यांचे (Farmer) म्हणणे ऐकले, ते त्यांच्यापर्यंत गेले, तर या महाराष्ट्रात आत्महत्या होणार नाहीत. शेतकऱ्यांचे दुःख काय आहे हे त्यांना समजेल. ते शेतकऱ्यांची काही ना काही मदत करू शकतील, असा सल्ला खा. राहुल गांधी यांनी दिला.

Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra : इंदिरा गांधी जयंतीनिमित्त महिलांचा भारत यात्रेत ९० टक्के सहभाग

भारत जोडो यात्रेअंतर्गत शुक्रवारी (ता. १८) रात्री शेगाव येथे सभा झाली. या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जयराम रमेश, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खा. मुकुल वासनिक, के. सी. वेणुगोपाल, एस. के. पाटील, तुषार गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस राजेश टोपे, एकनाथ खडसे, फौजिया खान, अरुण गुजराती यांच्यासह इतर उपस्थित होते.

खा. गांधी म्हणाले, ‘‘मागील सहा महिन्यांत असंख्य शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांनी आत्महत्या का केल्या, यामागील कारणे काय आहेत हे तुम्ही कोणत्याही शेतकऱ्यासोबत बोला, तो सांगेल. प्रत्येक शेतकरी आज आमच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही, असे सांगत आहे. पीकविमा काढला. त्यासाठी पैसे भरले. मात्र नुकसान होऊनही एक रुपयासुद्धा शेतकऱ्याला मदत मिळालेली नाही.’’

Bharat Jodo Yatra
Crop Insurance : वर्धा जिल्ह्यात पिकविम्याचे सात कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात

आमच्याकडे ५० हजार, एक लाखांचे कर्ज असेल तर त्रास दिला जातो. आमचे एक लाख रुपयांचे कर्ज माफ होत नाही. पण उद्योगपतींचे हजारो- करोडो माफ केले जातात. यातून शेतकऱ्यांमध्ये भीती तयार झाली आहे. आधीही विदर्भात शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. तेव्हा दिल्लीत काँग्रेसचे सरकार होते. त्या वेळी विदर्भाला पॅकेज दिले, असेही राहुल गांधी म्हणाले.

भारत जोडो यात्रेचा उद्देश तुमचे म्हणणे ऐकण्यासाठी आहे. द्वेषाने या देशाचा कधीही फायदा झालेला नाही. भारत जोडोमध्ये मला केवळ शेतकरीच भेटत नसून युवक भेटत आहेत. कुणाला इंजिनिअर व्हायचे, कुणाल पब्लिक सेक्टरमध्ये जायचे आहे. प्रत्येकाच्या मायबापाने लाखो खर्च केले आहेत. पण अनेकांना नोकरी मिळत नाही. आपल्याला असा भारत नको आहे. या देशात केवळ दोन-तीन उद्योगपतींच देशाचा पैसे घेऊन जातात, हे नको आहे. असा हिंदुस्थान आम्ही घडू देणार नाही, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी निर्धार व्यक्त केला.

भाजप द्वेष फैलावत आहे

देशात आज शेतकऱ्यांच्या, युवकांच्या मनात भीती पसरलेली आहे. या भीतीला भाजप आपापसांत लढवण्याचे काम करते आहे. द्वेष फैलावत आहे. वास्तविक द्वेषामुळे कुणाचाही फायदा होत नाही. हिंसा, द्वेषामुळे देशाचे भले होणार नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com