Dada Bhuse : ‘गिरणा ॲग्रो’त दोषी असेन तर राजकारण सोडेन; दादा भुसे विधानसभेत आक्रमक

खा. संजय राऊत यांना महागद्दार असे संबोधत ते भाकरी खातात ‘मातोश्री’ची आणि चाकरी करतात शरद पवार यांची असा उल्लेख मंत्री दादा भुसे यांनी केल्यामुळे राष्ट्रवादीचे सदस्य चवताळले.
Dada Bhuse
Dada Bhuse Agrowon

बाळासाहेब पाटील ः ॲग्रोवन वृत्तसेवा
मुंबई : बंदरे व खनिकर्म विकासमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्याबाबत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या ट्विटवरून मंगळवारी विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला.

राऊत यांना महागद्दार असे संबोधत ते भाकरी खातात ‘मातोश्री’ची आणि चाकरी करतात शरद पवार (Sharad Pawar) यांची असा उल्लेख केल्याने राष्ट्रवादीचे सदस्य चवताळले.

परिणामी सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. मात्र, भुसे यांनी शब्द माघारी घेण्यास आणि दिलगिरी व्यक्त करण्यास नकार दिला.

दरम्यान, संबधित कामकाज तपासून आक्षेपार्ह असेल अथवा शरद पवार यांच्याविषयी एकेरी उल्लेख असेल तर तो काढून टाकला जाईल, असे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितल्यानंतर कामकाज सुरळीत झाले.

Dada Bhuse
Raghunath Dada Patil : रघुनाथ यांनी केली नर्सरीची पाहणी

दादा भुसे यांच्याविरोधात शेतकरी रस्त्यावर आले आहेत. ‘गिरणा ॲग्रो’ नावाने १७८ कोटी २५ लाखांचे शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले. पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ १ कोटी ६७ लाखांचे शेअर्स केवळ ४७ सभासदांच्या नावावर दाखवले.

ही लूट आहे. लवकरच स्फोट होईल, असे ट्विट संजय राऊत यांनी केले होते. यावर दादा भुसे यांनी या आरोपांबाबत नियम ४८ अन्वये खुलासा करताना राऊत यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली.

Dada Bhuse
Dada Bhuse : सीमावर्ती भागाच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवणार

‘खासदार संजय राऊत यांनी आपल्यावर केलेल्या गिरणा अॅग्रो कंपनीबाबतच्या आरोपांची चौकशी कोणत्याही यंत्रणेमार्फत करावी, दोषी आढळलो तर राजकारणातून निवृत्त होईन.

अन्यथा राऊत यांनी खासदार आणि ‘सामना’च्या संपादकपदाचा राजीनामा द्यावा. राऊत नोकरी ‘मातोश्री’ची करतात आणि चाकरी शरद पवार यांची करतात, असे वक्तव्य केले.

या त्यांच्या वक्तव्यावर विरोधक संतप्त झाले, भुसे यांचे पवार यांच्याबद्दलचे वक्तव्य काढून टाका, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

त्यावर अध्यक्षांनी तपासून पाहू मग अनावश्यक बाबी काढून टाकू, असे सांगितले. त्यावर विरोधकांचे समाधान झाले नाही, गदारोळातच तीन विधेयके मंजूर करण्यात आली.

भुसे यांनी शब्द मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी पवार यांनी केली. मात्र आपण शरद पवार यांच्याबद्दल काहीही अनुचित बोललो नाही, त्यांच्याबद्दल आदरच आहे. त्यामुळे अध्यक्षांनी तपासून घ्यावे, असे दादा भुसे यांनी सांगितले.

शरद पवार यांच्याबद्दल काही एकेरी उल्लेख अथवा अनुचित उल्लेख असेल तर तो काढून टाकण्यात येईल, असे अध्यक्षांनी जाहीर केल्यावर वातावरण शांत झाले.

पवार यांच्याबद्दल आदरच..पण,
उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी या चर्चेत सहभाग घेत राऊत यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, की ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत आम्हाला आदर आहे.

ते कृषिमंत्री असताना राज्यात साखर उद्योगात चांगले काम केले आहे. पण संजय राऊत हे आमच्या मतांवर निवडून आले.

आम्हाला गटारातले पाणी, प्रेत अशी संभावना ते रोज करतात. आमच्याबद्दल कुणी काही बोलले तर आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com